Chandrkant Patil - jayant Patil
Chandrkant Patil - jayant Patil  Sarkarnama
महाराष्ट्र

नगरपंचायतील हक्काच्या 'पाटीलकी'साठी जयंतराव आणि चंद्रकांतदादांमध्ये चढाओढ

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आज राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या बाजूने लागले असून हे निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला आहे, असा दावा जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. तसेच या निकालांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसबाबत बोलणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत मतदान केल्याबद्दल राज्यातील सर्व जनतेचे आणि पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचेही जयंत पाटील यांनी आभारही मानले. ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्यामधून तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. पक्षाच्या बांधणीसाठी विविध उपक्रम हाती घेतली होते. जनता दरबारमधून जनतेची कामेही तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न केला होता, त्याचाही फायदा या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाला आहे.

चंद्रकांतदादा म्हणतात भाजपचं मोठा पक्ष :

दरम्यान नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला (bjp) यश मिळाले आहे. नगरपंचायत, जिल्हापरिषदेच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर लढल्या जातात. काही जुनी देणी-घेणी असतात. ज्या ठिकाणी आम्ही जिंकलो तिथं आम्ही कौतुक करणार, येत्या महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीला पुरुन उरु,'' असा ठाम विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी व्यक्त केला.

“भाजपा राज्यातला क्रमांक एकचा पक्ष आहे, हे आज पुन्हा एकदा हे सिद्ध झालं ” असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. “अजुनही आम्ही म्हणत आहोत की एकएकटे लढा मग पाहुयात कोणाची ताकद जास्त आहे.” असं म्हणत पाटलांनी ठाकरे सरकारला आव्हान दिलं. ''महाविकास आघाडीचा बेबनाव आहे, तो प्रत्येक वेळी समोर येतो. अनेक ठिकाणी अर्ज भरलेल्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली. तरी चांगले सदस्य निवडून आले. उद्यापासून आम्ही अपयशाचं आत्मपरीक्षण करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT