नगरपंचायतीतही भाजप नंबर एकचा पक्ष ; पालिकेत आघाडीला पुरुन उरु!

“भाजपा राज्यातला क्रमांक एकचा पक्ष आहे, हे आज पुन्हा एकदा हे सिद्ध झालं ” असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
chandrakant patil
chandrakant patilsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ''नगरपंचायतीच्या निवडणुकीत (nagar panchayat elections) भाजपला (bjp) यश मिळाले आहे. नगरपंचायत, जिल्हापरिषदेच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर लढल्या जातात. काही जुनी देणी-घेणी असतात. ज्या ठिकाणी आम्ही जिंकलो तिथं आम्ही कौतुक करणार, येत्या महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीला पुरुन उरु,'' असा ठाम विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी बुधवारी व्यक्त केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपा राज्यातला क्रमांक एकचा पक्ष आहे, हे आज पुन्हा एकदा हे सिद्ध झालं ” असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. “अजुनही आम्ही म्हणत आहोत की एकएकटे लढा मग पाहुयात कोणाची ताकद जास्त आहे.” असं म्हणत पाटलांनी ठाकरे सरकारला आव्हान दिलं.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ''महाविकास आघाडीचा बेबनाव आहे, तो प्रत्येक वेळी समोर येतो. अनेक ठिकाणी अर्ज भरलेल्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली. तरी चांगले सदस्य निवडून आले. उद्यापासून आम्ही अपयशाचं आत्मपरीक्षण करणार आहोत,''

chandrakant patil
बच्चू कडूंचा 'प्रहार', एकहाती सत्ता ; भाजपला भोपळा

''कोरोना काळात २६ महिने आघाडी सरकारचे नेते उपलब्ध नसल्याने आम्हाला यश मिळालं आहे. त्यांना खुर्ची मिळाली आहे, बाकी नेते, कार्यकर्ते मरू देत अशी शिवसेनेची भूमिका आहे. पण त्यांना त्रास होत आहे. राजाने ठरवलं खुर्ची उदार आहे, मग पक्षाची वाट लागली तरी चालेल,'' अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता पाटलांनी त्यांच्यावर टीका केली.

''ज्या ठिकाणी ओबीसीची जागा आहे. त्याठिकाणी ओबीसी उमेदवार उभे करणार आहेत. ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर त्याविरोधात भाजपने आवाज उठविला आहे. पण अन्य कोणालाही त्याचं काहीचं नाही. प्रत्येकाला टीव्हीसमोर येऊन बोलायचे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा हुशार मुख्यमंत्री झाला नाही. त्यांनी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिले. ओबीसी आरक्षण हा विषय फार किचकट आहे. तो ठाकरे सरकारच्या डोक्यात जात नाही,''असे पाटील म्हणाले.

''ओबीसींची सरकारनं फसवणूक केली आहे. शिवसेनेनं खुर्चीसाठी पक्ष रसातळाला न्यायचं ठरले आहे. राष्ट्रवादीने त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायचे, अन् राष्ट्रवादीला त्यांनी पक्ष द्यायचा हे ठरलं आहे,'' असे पाटील यांनी सांगितलं.

chandrakant patil
अब्दुल सत्तारांचा दानवेंना चकवा ; सोयगाववर भगवा फडकविला

''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या विधानाबाबत पाटील म्हणाले की आमच्या कार्यकर्त्यांनी 100 पेक्षा जास्त ठिकाणी नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणी न्यायालयात जाणार आहेत,'' असे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com