Narayan Rane, Vinayak Raut
Narayan Rane, Vinayak Raut sarkarnama
महाराष्ट्र

फडणवीसांना पुढे करत विनायक राऊतांनी राणेंना डिवचले; 'त्या' ५ हत्या कोणी केल्या?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यात भाजपचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या खांद्यावर बंदुक ठेवत राणेंवर निशाणा साधला. तसेच दिशा सॅलियन, सुशांतसिंग राजपूत, रमेश मोरे, जयंत यादव यांच्या हत्यांचा राणेंनी केलेल्या आरोपांना विनायक राऊत यांनी त्याचं भाषेत उत्तर दिले.

विनायक राऊत यांनी आज शिवसेना भवनात जाहिर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या पत्रकार परिदेवर खोदा पहाड निकला कचरा असा टोला लगावला. तसेच विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना उत्तर देण्यासाठी काही व्हिडीओ सादर केले. यात देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या नारायण राणेंवर आरोप करताना विधान परिषदमध्ये केलेल्या भाषणाचा व्हिडीओ दाखवला. तसेच किरीट सोमय्यांचाही राणेंवर घोटाळ्याचा आरोप करतानाचा व्हिडीओ दाखवला.

विनायक राऊत म्हणाले, नारायण राणे यांना वाढत्या वयामुळे विस्मरण होत असेल. भूतकाळ आठवत नसल्यास आठवण करून देतो. सिंधुदुर्गात नारायण राणे कारकीर्दीत खून दरोडे खंडणी नऊ वर्ष प्रकार होत होते. यात रमेश गोवेकर, अंकुश राणे, सत्यविजय भिसे, मंचेकर ह्यांचे खून कोणी केले? कोणी कशा पद्धतीने पचवले? श्रीधर नाईक खुनात आरोपी म्हणून कोण होत हे जाहीरपणे सांगण्याची वेळ आणू नका. आम्ही आता महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेणार आहे. सिंधुदुर्गात ज्या राजकीय हत्या झाल्या त्यामागे कुणाचा हात होता त्यांचा शोध घेण्याची विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नारायण राणे काय म्हणाले होते?

नारायण राणे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत शिवसनेवर जोरदार आरोप केले. दिशा सॅलियन आणि अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्याच झाली असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच यावेळी त्यांनी रमेश मोरेची हत्या कोणी केली? का केली? त्याची कोणाशी दुष्मनीच नव्हती. जयंत यादवची हत्या का झाली? माहित नाही का आम्हाला? कोणी समजू नये आम्ही आणखी खोलात जावू, असा इशाराही राणे यांनी यावेळी बोलताना शिवसेनेला दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT