"दिशा सॅलियन, सुशांतसिंग राजपूत, रमेश मोरे"; आम्हाला आणखी खोलात जायला लावू नका

Narayan Rane | BJP | Shivsena | Uddhav Thackeray : दिशा सॅलियन आणि सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार!
Narayan Rane
Narayan Rane sarkarnama

हा महाराष्ट्र, अशा रितीने? बलात्कार करायचे, आपलं ऐकलं नाही तर ठार मारायचे. कोणी केली काय केले? मला काही जुन्या घटनांचा इतिहास आठवतो. त्याला काही गुन्ह्यांचे, हत्यांचे आरोपी नाहीत सापडतं. आता मला सांगा रमेश मोरेची हत्या कोणी केली? का केली? त्याची कोणाशी दुष्मनीच नव्हती. जयंत यादवची हत्या का झाली? माहित नाही का आम्हाला? कोणी समजू नये आम्ही आणखी खोलात जावू, असा इशाराही राणे यांनी यावेळी बोलताना दिला.

राणे पुढे म्हणाले त्यावेळी कोणत्या मंत्र्यांची गाडी होती? त्या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज गायब कसे झाले. १३ जूनच्या रात्री सीसीटीव्ही कॅमेरे होते. लोक सांगतात इमारतीमधील. ठराविक माणसाची अॅम्बूलन्स कशी आली? कोणी आणले? त्याला हॉस्पिटलमध्ये कोणी नेले? सगळे पुरावे नष्ट कोणी केले, याची चौकशी होणार. यात कोणते अधिकारी होते हे समोर येणार.

तसेच दिशा सॅलियनचा पोस्ट मार्टम रिपोर्ट अद्याप का आला नाही? ती ज्या इमारतीत राहायची त्या दिवशी ८ जूनचे रजिस्टर कोणी फाडले? कोणाला इंटरेस्ट होता? त्यानंतर दिशा सॅलियन बद्दल सुशांतसिंग बद्दल कळालं त्यावेळी तो म्हणाला मी यांना सोडणार नाही. त्यावेळी काही लोक सुशांतसिंगच्या घरी गेले. त्यांच्यात दिशा सॅलियनवरुन बाचाबाची झाली आणि त्यातच त्याची हत्या झाली, असा गौप्यस्फोटही राणे यांनी केला.

यानंतर त्यांनी दिशा सॅलियन प्रकरणाला सुरुवात केली. ते म्हणाले तिची बलात्कार करुन हत्या झाली आणि सांगितले आत्महत्या केली. का करेल ती आत्महत्या? एक तर ती पार्टीला जात नव्हती. तिचा तो मित्र रोहण राय. त्यानंतर तिला थांबायला सांगितले, पण ती थांबली नाही. घरी निघाली. त्यानंतर कोण कोण होते. पोलिस संरक्षण कोणाला होते. तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर पोलिस कोणाचं संरक्षण करत होते?

उद्धव ठाकरेंनी मातोश्री पार्ट एक दुरुस्त केली. मातोश्री पार्ट २ युतीची सत्ता असताना पैसे भरुन बेकायदेशीर बांधकाम कायदेशीर केली. त्यांच्या दोन्ही इमारतींचे प्लॅन माझ्याकडे आहेत. पण मी कधीही हे प्रेसला सांगितले नाही. प्रदिप भालेकर यांनी केलेले ट्विट राणे यांनी यावेळी वाचून दाखवले आणि सिंधुदुर्गातील काही लोकांनी राजकीय सुडबुद्धीने आरोपांची सुरुवात केली.

इथे अन्य कोणताही उद्योग चालू नाही. अशा वेळी महापालिका आपल्याकडे आहे. त्यामुळे सातत्याने तक्रारी करणं सुरु आहे. पण सगळे प्लॅन बघायचे आणि सांगायचे सगळं ओके आहे. माननीय बाळासाहेब यांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. मात्र आता शिवसेनेचे प्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर आली आहे.

मला अनेक जणांचे फोन आले, घराला नोटीस आली आहे. बोलायचाय म्हणून पत्रकारांचे फोन आले. म्हणून मी वास्तव सांगण्यासाठी इथे आलोय. या घरात मी १७ सप्टेंबर २००९ साली आलो आहे. जवळपास १३ ते १४ वर्ष झाले. या इमारतीचे आर्किटेक्ट आज तलाठी आहेत. देशात, जगात त्यांचे नाव आहे. १९९१ च्या नियमांप्रमाणे हे बांधकाम झाले. एकही गोष्ट अपूर्ण न ठेवता मी हे काम केले आहे. त्यानंतर एक इंचही बांधकाम केलेले नाही. आमच्या कुटुंबियांसह एकूण ८ जण इथे राहतो.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह त्यांचे पुत्र आणि आमदार नितेश राणे हे देखील उपस्थित आहेत.

यानंतर आता नारायण राणे यांनी आज यासंदर्भात एक पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत ते नेमके कोणते गौप्यस्फोट करतात याकडे लक्ष लागले आहे. तसेच मातोश्रीवरील ते चौघे कोण यांच्याबाबतही काही खुलासा करतात का याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल एक ट्विटबॉम्ब टाकत मोठी खळबळ उडवून दिली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील सत्य दोन वर्षे पूर्ण होत असतानाही अद्याप बाहेर आलेले नाही. त्याची मॅनेजर दिशा सॅलियनने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. सुशांत प्रकरणातील गूढ अद्याप केंद्रीय अन्वेषण विभागाला उलगडता आलेले नाही. असे असतानाही राणेंनी सुशांतची हत्या तर दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे समोर येईल. तसेच मातोश्रीवरील चौघांना लवकरच ईडीची नोटीस बजावण्यात येईल, असा गौप्यस्फोटही राणेंनी केला आहे. त्यापार्श्वभूमीवर ते चौघे नेमके कोण, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com