Beed News : केज तालुक्यातील मस्साजाेगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी तपास करून पोलीस यंत्रणेने ८० दिवसांनी दोषारोपपत्र दाखल केले. त्या दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून आठ जणाविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले आरोपी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड याच्याशी संबंधित असल्याचे पुढे आले. त्यानंतर गेल्या अनेक दिवसापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. मात्र, त्यांनी राजीनामा दिला नाही.
अधिवेशन सुरु झाल्यानंतर संतोष देशमुख यांंना झालेल्या अमानुष छळाची फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. त्यामुळे आता येत्या काळात बीडच्या राजकारणात बदल करताना कोणाला नेतृत्व करण्याची संधी उपमुख्यमंत्री अजित पवार देणार, याची उत्सुकता सर्वाना आहे.
बीडचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरच सर्व जबाबदारी आहे. त्यांची ओळख प्रशासनावर वचक असणारा नेता अशीच राहिली आहे. मात्र, बीड जिल्ह्यात नेतृत्वाची संधी देत असताना त्यांच्या हातून काही चुका घडल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात या झालेल्या चुकांची पुनरावृत्ती त्यांना टाळावी लागणार आहे.
बीडच्या राजकारणात येत्या काळात अजितदादांना सक्रिय होऊन आता नवे बदल करावे लागणार आहेत. हे करीत येत्या काळात नव्या नेतृत्वालाही संधी द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता याठिकाणी नवे नेतृत्व उभे करीत असताना आता योग्य व्यक्तीची पारख करून त्याच्या हाती जबाबदारी सोपवावी लागणार आहे. त्यामुळे अजितदादा कोणाकडे सूत्रे सोपवणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळामध्ये आहे.
पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी प्रशासकीय पातळीवर काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसात बीडचे पाेलीस अधीक्षक बदलल्यापासून प्रशासकीय पातळीवर काही नवे बदल दिसत आहेत. जातीय सलोखा रहावा म्हणून नवनीत कॉवत या पोलीस अधिकाऱ्याने अडनावांनी हाका मारण्याची पद्धत बंद केली. तक्रार करण्यासाठी आता जलद प्रतिसाद संकेतांक अर्थात क्यूआर कोड उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवून घेण्याचे प्रमाण वाढते आहे. प्रशासनात केल्या जाणाऱ्या बदलांना आता सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
काही दिवसापूर्वी जिल्हा वार्षिक आराखड्याची बैठक पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankja Munde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्तपणे घेतली होती. तत्पूर्वी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांशी स्वतंत्र चर्चा केली होती. त्यामुळे येत्या काळात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांचे नेतृत्व प्रशासकीय पातळीवर राहील, असे चित्र यामधून दिसून येत आहे.
बीड जिल्ह्यात पोलीस ठाण्यातील वाद सोडविण्यासाठी नेत्यांनी फोन करावा अशी पद्धत आहे. मात्र, दुसरीकडे पंकजा मुंडे कधीच त्यामध्ये हस्तक्षेप करीत नाहीत. त्या कधीच पोलीस ठाण्यात फोन करीत नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी कोणाची तक्रार नसते. बीड जिल्हयातील निधी वाटप करीत असताना यापुढे अजित पवार यांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात सामान निधी वाटप केला जाणार असल्याने कोणाला निधी विषयी तक्रार करण्याची गरज उरणार नाही.
(25 वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.