Congress ramesh chennithala Congress ramesh chennithala
महाराष्ट्र

Congress Politics : सर्वाधिक जागांची मागणी का? काँग्रेस नेते बैठकीत आकडेवारीच मांडणार

Rajesh Charpe

Congress Politics : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. पुढील 10 दिवसांत जागा वाटपाची चर्चा पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. विदर्भातील सर्वाधिक जागा काँग्रेसला हव्या आहेत. 62 पैकी बहुतांश जागेवर काँग्रेसने दावा सांगितला आहे.

काँग्रेसला सर्वाधिक जागां का हव्या आहेत हे काँग्रेस लोकसभा आणि मागील विधानसभा निवडणकीची आकडेवारी आणि मागील इतिहास महविकास आघाडीच्या बैठकीत समोर ठेवणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथाला यांनी सांगितले.

काँग्रेसच्या बैठकीसाठी चेन्निथाला नागपूरला आहे होते. ते म्हणाले, महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा येत्या दिवसांत सुरू होणार आहे. विदर्भ काँग्रेसचा गड आहे. इंदिरा गांधीच्या काळापासून विदर्भ काँग्रेसच्या सोबत राहिली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहे. विदर्भाने काँग्रेसला मोठा पाठिंबा दिला आहे. काँग्रेसची पाळेमुळे विदर्भात रुजली आहेत.

मुख्यमंत्री कोणाचा?

मुख्यमंत्री कोणाचा होईल? कोण दावा करणार? कोणाला प्राधान्य? हा मुद्दा आमचा नाही. यावरच आम्हाला चर्चाही करायची नाही. भाजपला सत्तेतून हटवायचे हीच आघाडीची प्राथमिकता आहे. निकालानंतरच महाविकास आघाडीची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा होईल, असेही चेन्निथाला यांनी स्पष्ट केले.

कोणी लहान मोठा भाऊ नाही

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बनवने एवढेच आमचे उद्दिष्ट आहे. या निवडणुकीत कोणी लहान भाऊ नाही आणि मोठा भाऊ नाही. आम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी सर्व लहान-मोठ्या पक्षांना सोबत ठेवायचे आहे. संपूर्ण महाराष्ट्र सत्ता परिवर्तन होणार आहे. सर्वच पक्षांच्या सर्वेतून ते दिसून येत आहे. त्यामुळेच भाजपला निवडणुका लवकर घ्यायची नाही. 'वन नेशन वन इलेक्शन'वर बोलणाऱ्या भाजपने पराभवाच्या भीतीने हरियाण आणि जम्मू-काश्निरसोबत निवडणूक घेतली नसल्याचा आरोपही रमेश चेन्निथाला यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT