Solapur News : कृष्णा, कोयना खोऱ्यातील पाणी वाटपावरून सांगली व सातारा या दोन जिल्ह्यात पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या दोन जिल्ह्यांत मतभेद आहेत. त्यामुळे या दोन जिल्ह्यांत लागलेल्या कुस्तीत सोलापूर जिल्ह्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगत पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी हिवाळी अधिवेशनात पाणी प्रश्नांवरून आवाज उठविला. त्यावर जलसंपदामंत्री फडणवीस यांनी उत्तर देताना दोन जिल्ह्यांत लागलेल्या कुस्तीत सोलापूर जिल्ह्याचे नुकसान होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
कृष्णा, कोयना खोऱ्यातील पाणी वाटपावरून सांगली व सातारा या दोन जिल्ह्यात लागलेली कुस्ती आमच्यावर आमच्या सोलापूर जिल्ह्य़ाच्या अंगावर येत असून ती येऊ नये म्हणून म्हैसाळ योजनेचे पाणी टेल टू हेड याप्रमाणे द्यावे, अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी हिवाळी अधिवेशनात बोलताना केली.
हिवाळी अधिवेशनात कोयनेच्या पाणी वाटपावरून आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार समाधान आवताडे (Samadhan Awatade), आमदार विक्रम सावंत यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये बोलताना आमदार आवताडे म्हणाले की, कृष्णा कोयनेच्या पाणी वाटपात सांगोला व मंगळवेढा हे दोन तालुके शेवटच्या टोकाला येत असल्यामुळे दोन जिल्ह्यात लागलेल्या कुस्तीमुळे त्यांना पाणी मिळत नाही.
पाणी वाटप करताना टेल टू एंड याप्रमाणे वाटप करण्याची मागणी करत जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रयत्नान म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत तालुक्यातील रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद, पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर बु, सलगर खु, बावची, पौट, आसबेवाडी, लवंगी, शिवणगी, येळगी, सोड्डी, या १८ गावांना या गावांना लाभ झाला.
गेल्या काही दिवसांपूर्वी म्हैसाळ उपसा सिंचन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये आमदार आवताडे यांनी म्हैसाळ उपसा सिंचन पाणी योजनेअंतर्गत वरील भागांना ज्या पद्धतीने पाणी मिळते त्याच पद्धतीने म्हैसाळ कालवे उपविभाग वितरिका क्रमांक-२ मधून पूर्ण दाबाने पाणी देण्यात यावे. त्याचबरोबर वाटप मंगळवेढा तालुक्यातील जनतेसाठी करण्यात यावे, अशी मागणी केली.
या मागणीची दखल घेऊन टेल टू हेड अंतर्गत तालुक्यातील विविध गावांना या पाण्याची वितरीत करण्याचे आदेश दिले. अगोदरच दुष्काळाचा कलंक असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हे पाणी तालुक्याला मिळणे अतिशय गरजेचे असल्याचेही अवताडे यांनी सांगितले.
त्यावर बोलताना जलसंपदामंत्री फडणवीस (Devendra Fadnvais) म्हणाले, दोन जिल्ह्यांत लागलेल्या कुस्तीत सोलापूर जिल्ह्याचे नुकसान होणार नाही. किंबहुना ही कुस्ती लागूच नये, यासाठी प्रयत्न करणार आहे. या तिघांनी एकत्रितपणे नीट नांदावे, अशा पद्दतीने प्रयत्न करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
(Edited by Sachin Waghmare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.