Kolhapur News : राज्यातील विरोधकांकडे बोलायला काही मुद्दा उरलेला नाही. त्यांचा विकासाशी काहीच संबंध नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जे काही करून दाखवले त्याचे उत्तर हे देऊ शकत नाहीत. विरोधक गुजरातचे प्रमोशन करत आहेत, हा महाराष्ट्रद्रोह नाही का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
कोल्हापूरमध्ये मंगळवारी महायुतीच्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या तीनही पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकावर सडकून टीका करताना निशाणा साधला. (Devendra Fadnavis News)
कोल्हापुरातून महायुतीच्या (Mahayuti) प्रचाराची सुरुवात करण्यात आली. या निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून हात गायब झाला आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये देखील तेच हवे आहे. कोल्हापुरातून प्रचाराला सुरुवात करतोय विश्वास आहे की विजयाची सुरुवात केली आहे.
मंगळवारी उद्धव ठाकरे कोल्हापुरात आले होते. शिवाजी महाराजांना इंग्रजांवर राग होता म्हणून सुरत लुटली, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पण इंग्रज होते कुठे? तुम्हाला औरंगजेबाचे नाव घ्यायची लाज वाटायला लागली का ? असा सवाल या निमित्ताने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित केला.
मता करता इतके लांगूनचालन बरे नव्हे. हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावातून तुम्ही हिंदू हृदयसम्राट काढून टाकले. आता तुम्हाला औरंगजेबाचे नाव घ्यायला लाज वाटायला लागली. अरे उद्धवजी या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी मुसलमान देखील औरंगजेबाला आपला नेता मानत नाहीत. उद्धव ठाकरे तुम्हाला माझी इतकीच विनंती आहे की, माझ्यासोबत चला मुंब्र्याला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधू. तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. राज्यातले पहिलं मंदिर तिथे उभारू आणि छत्रपती शिवरायांना वंदन करू, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
महिलांना तुमच्या वाचाळविरांपासून सुरक्षा दिली पाहिजे. पहिलं तुमचं घर सुधारा मग सुरक्षेवर बोला. महिलांना सुरक्षा देण्याचे काम हेच सरकार करणार आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यास गुन्हेगाराला कठोर शिक्षा करणार का ? असा सवाल विचारला जात होता. आम्ही कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले.
जाहीरनाम्यातील केवळ दहा मुद्दे हा ट्रेलर
जाहीरनामा लवकरच येणार आहे. जाहीरनाम्यातील केवळ दहा मुद्दे हा ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे. ज्या-ज्या राज्यात विरोधकांनी घोषणा केल्या त्या राज्यातील स्थिती काय ? असा सवालही त्यांनी केला. पण ज्या-ज्या राज्यात भाजपने घोषणा केली. त्या-त्या राज्यात योजना अजूनही चांगल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.