Yashomati Thakur devendra fadnavis sarkarnama
महाराष्ट्र

Yashomati Thakur : राहुल गांधींचं अमेरिकेत वक्तव्य, फडणवीसांचा पलटवार; यशोमती ठाकूरांनी निवडणुकीतील ‘गोंधळ’ मांडला मुद्देसूदपणे

Yashomati Thakur On Maharashtra Election : कधी ना कधी निवडणुकीतील हा फ्रॉड जनतेच्या समोर नक्की येईल. काँग्रेस पक्ष तेपर्यंत या मुद्दयांवर लढा देत राहील, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.

Roshan More

Yashomati Thakur News : राहुल गांधी हे अमेरिकेच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी बोस्टनमध्ये ब्रिस्टन विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना निवडणुकीत प्रक्रियेत घोळ झाल्याचे म्हटले होते. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा संदर्भ दिला. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेशात जाऊन भारतीय लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करत आहेत, असे फक्त त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. यावरून आता काँग्रेसच्या माजी आमदार यशोमती ठाकूर महाराष्ट्रातील निवडणुकीत गडबड झाल्याच्या समर्थनार्थ विविध मुद्यांची यादीच दिली आहे.

ठाकूर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'शेवटच्या दोन तासात वाढलेले लाखो मतदार, मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण देण्यास निवडणूक आयोगाकडून झालेली टोलवाटोलवी, बीड येथील पोलीस अधिकाऱ्याचा ईव्हीएमबाबत केलेला दावा, वर्तमानपत्रांनी निकालाच्या आकडेवारीतील मांडलेली तफावत असे अनेक मुद्दे निवडणुकीविषयी शंका उपस्थित करतात.'

'महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गडबड झाली आहे हे आता दिवसेंदिवस आणखी स्पष्ट होत आहे. लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी हे निकाल लागल्यापासून या मुद्दयांवर ठाम असून त्यांनी लोकसभेत देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र निवडणूक आयोग प्रत्येकवेळी अशा गोष्टींवर पांघरून घालण्याचे काम करत आहे.', असा दावा देखील ठाकूर यांनी केला आहे.

फ्रॉड जनतेच्या समोर येईल...

राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मात्र, कधी ना कधी निवडणुकीतील हा फ्रॉड जनतेच्या समोर नक्की येईल. काँग्रेस पक्ष तेपर्यंत या मुद्दयांवर लढा देत राहील, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी नेमके काय म्हणाले?

राहुल गांधी म्हणाले, 'निवडणूक प्रक्रियेत घोळ आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत सायंकाळी साडेपाच ते साडेसात या दोन तासांत 65 लाख मतदान हे अशक्यच आहे. कारण एका मतदाराला मतदान करण्यासाठी साधारण तीन मिनिटांचा वेळ लागतो. येवढे सगळ्यांनी मतदान केले असते तर पहाटे तीनपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालली असती आणि मतदान करायला चार वाजले असते.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT