26/11 Mumbai attacks : 26/11 हल्ल्यात काँग्रेस अन् राष्ट्रवादीचा वाटा; भाजप नेत्याच्या गंभीर आरोपांवर अजितदादांचं सडेतोड उत्तर

Pune BJP Madhav Bhandari allegations Congress NCP 26/11 Mumbai terror attacks political controversy : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेले विक्रम भावे त्यांनी लिहिलेल्या ‘दाभोलकर हत्या आणि मी’ पुस्तकाचे प्रकाशन भाजप उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या हस्ते झाले.
Mumbai attacks
Mumbai attacksSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मुंबईवर झालेल्या 26/11 च्या आतंकवादी हल्ल्याबाबत भाजपच्या नेत्याने गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन सरकारमधील असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा 26/11 च्या हल्ल्यांमध्ये वाटा होता, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला आहे.

माधव भंडारी यांच्या हस्ते रविवारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेले विक्रम भावे त्यांनी लिहिलेल्या ‘दाभोलकर हत्या आणि मी’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

माधव भंडारी म्हणाले, "26/11 चा जो इतका मोठा आतंकवादी हल्ला झाला स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय हा हल्ला घडू शकत नाही". मुंबईवर (Mumbai) हल्ला होणार याबाबत सगळ्यांना कल्पना होती,’ या हल्ल्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वाटा होता, अस खळबळजनक दावा भाजप उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी रविवारी केला आहे.

Mumbai attacks
Gadchiroli Naxal Operation : नक्षलवादविरोधी अभियान; महानिरीक्षक संदीप पाटलांचं 'चक्रव्यूह' यशस्वी

याबाबत अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारला असता अजित पवार म्हणाले, या प्रकरणांमध्ये चौकशी करावी आज केंद्रामध्ये आपले सरकार आहे तसंच राज्य सरकारमध्ये देखील आपलं सरकार आहे. तसेच पोलीस यंत्रणा देखील आपल्या ताब्यात आहे. त्यामुळे याची चौकशी करावी आणि यामध्ये जो दोशी असेल त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल, असं अजित पवार यांनी सांगितला आहे.

Mumbai attacks
Nagpur Teacher Recruitment Scam: शिक्षक भरती गैरव्यवहारात भाजपचा आमदार? त्यांच्या हट्टापायी पोलिसांच्या कारवाया सुरू...

ज्यावेळेस 26/11 घडलं त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांची ती जबाबदारी होती. त्यांनी ती उत्तर द्यायला हवी, अजित पवार गृहमंत्री नव्हते. मी बोलल्याचा अर्थ कोणी काय काढायचा ते ज्याने त्यांनी ठरवावे, असंही अजित पवार यांनी म्हटले.

दरम्यान, या वक्तव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्यानंतर माधव भंडारी यांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. माधव भांडरी म्हणाले, काल मी जे भाषण केलं त्याचा वेगळा अर्थ घेतला गेला. जे मी बोललो नाही ते तोंडामध्ये घातला आहे. पण मी 26/11 हल्ला माहिती होता की नाही, त्यावेळच्या सरकारला, एका प्रेस नोटद्वारे हल्ला होणार असल्याची शक्यता आहे, अशी माहिती दिली होती.

त्यातील 85% जागे सहित माहिती होती. पाच महिने अगोदर सरकारला जर माहिती होतं हल्ला होणार आहे, तर मग ती सरकारची जबाबदारी होती हल्ला रोखण्याची. माहिती असून सुद्धा राज्य सरकारने तो हल्ला का रोखला नाही. 26/11 हल्ल्यात अनेक अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले. मग आता राणाला भारतात, आल्यावर त्यावर चर्चा सुरू झाली, त्यावेळेसच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यकर्त्यांनी यावर बोललं पाहिजे, असेही माधव भंडारी यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com