Yavatmal News : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. विरोधकांनी घेतलेल्या हरकतीनंतर न्यायालयाच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. आर्णी तालुका गटातून महायुतीचे उमेदवार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते अनिल आडे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उमेदवारी अर्ज बाद झाल्याने महायुतीच्या राजकीय समीकरणाला मोठा धक्का बसला आहे.
आर्णी तालुक्यातील एका सहकारी संस्थेचे अनिल आडे हे संचालक असून, दुसऱ्या एका सोसायटीतून प्रतिनिधी असल्याचा मुद्दा काँग्रेसचे (Congress) मनीष पाटील यांनी उपस्थित केला होता. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पात्रतेच्या निकषांचा आधार घेत पाटील यांनी आडे यांच्या उमेदवारीवर हरकत घेतली होती.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मनीष पाटील यांची हरकत फेटाळून लावत अनिल आडे यांचे नामनिर्देशन पत्र कायम ठेवले होते. त्यामुळे आडे यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या निर्णयाविरोधात मनीष पाटील यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयात झालेल्या सुनावणीत पाटील यांची हरकत ग्राह्य धरण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने अनिल आडे यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचे (Shivsena) नेते अनिल आडे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आर्णी तालुका गटातील महायुतीच्या राजकीय समीकरणाला मोठा धक्का बसला असून, या निर्णयाचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.