Sanjay Rathod, Bhavana Gawali  Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Rathod News : संजय राठोड यांचे भावना गवळी यांच्याबद्दल मोठे भाकीत !

Yavatmal–Washim LokSabha Election 2024 : यवतमाळ - वाशीम लोकसभा मतदारसंघ विद्यमान खासदार भावना गवळी यांना तिकीट दिले जाते की नाही, यावरून जोरदार रणकंदन सुरू आहे. येत्या एक दोन दिवसांत त्याविषयीचा निर्णय होईल. पण, तत्पूर्वी मंत्री संजय राठोड यांनी भावना गवळी यांच्याबद्दल मोठे भाकीत केले आहे.

Sachin Deshpande

Loksabha Election 2024: यवतमाळ - वाशीम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडे आहे. असे असताना तिथे भाजपचे अनेक नेते इच्छुक आहे. इतकेच नाही तर मंत्री संजय राठोड हेदेखील इच्छुकांच्या यादीत आहेत. असे असताना मंत्री संजय राठोड यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना मोठे भाकीत व्यक्त केले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस नेदेखील उमेदवारी मागितली आहे. अशा परिस्थितीत महायुतीतर्फे भावना गवळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब अद्याप झाला नाही असे असताना नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना संजय राठोड यांनी व्यक्त केलेला अंदाज यवतमाळ-वाशीम मतदारसंघात चर्चिला जात आहे.

शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असलेल्या मतदारसंघात उमेदवार निश्चितीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशा वेळी मंत्री संजय राठोड यांचे वक्तव्य समोर आले असताना त्यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महायुतीचे उमेदवार निवडणुकीत यशस्वी होतील, असा दावा करताना संजय राठोड यांनी यवतमाळ - वाशीम लोकसभा मतदारसंघाकडे पाठ फिरविल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असल्यामुळे येथे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांचेदेखील लक्ष असून, या ठिकाणचा उमेदवार अद्याप घोषित होणे बाकी आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत येथे होण्याचे चिन्ह असून, भावना गवळी यांच्याकडे बचत गटाच्या महिलांचे सशक्त संघटन पाहता येथे भावना गवळी यांना कोण चॅलेंज करते हे पाहण्यासारखे ठरेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मतदारसंघाचे भवितव्य ठरविणार आहेत. या मतदारसंघात पुन्हा एकदा भावना गवळी यांच्यावर शिवसेना आणि महायुती शिक्कामोर्तब करते की, आणखी कोणावर विश्वास टाकते हे येत्या एक दोन दिवसांत निश्चित होईल. या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा झाला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा नुकताच झाला आहे. अशा परिस्थितीत अद्याप येथील महायुतीचा तसेच महाविकासचा उमेदवार घोषित होणे बाकी आहे.

नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री संजय राठोड यांनी चंद्रपूर मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार हे मोठे मताधिक्याने विजयी होतील, असा आशावाद व्यक्त केला. त्याच वेळी त्यांनी यवतमाळ -वाशीम मतदारसंघात भावना गवळी या पाच वेळा जिंकल्या असून, महायुतीच्या त्याच उमेदवार असतील असे मोठे भाकीत वर्तविले आहे. त्यांनी थेट भावना गवळी यांच्यावर विश्वास टाकल्याने लोकसभा निवडणुकीत संजय राठोड यांनी माघार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जोपर्यंत उमेदवार निश्चिती होत नाही, तोपर्यंत नेमके काय राजकारण पडद्याआड होत राहते, याची कल्पना कोणालाच येत नाही. अशा परिस्थितीत संजय राठोड यांचे विधान 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भावना गवळी यांना तिकीट देतील आणि त्या विक्रमी मतांनी जिंकतील' हे विद्यमान खासदार भावना गवळी यांना दिलासा देणारे ठरणार आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT