Ahmednagar Politics : आमदार लंकेंनी थांबवली घड्याळाचे टिकटिक; तुतारीकडे वाढला ओढा...

Nilesh Lankhe News : नीलेश लंके यांच्या सलग दोन पोस्टमध्ये त्यांनी 'घड्याळ' चिन्ह वापरलेले नाही.
Nilesh Lankhe News :  Ahmednagar Politics
Nilesh Lankhe News : Ahmednagar Politics Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : आमदार नीलेश लंके गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकांच्या केंद्रस्थानी आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटात सामील झालेले लंके हळूहळू 'तुतारी'कडे वळू लागले आहेत. आमदार लंके यांच्या सोशल मीडियावर घड्याळ चिन्हाचा वापर कमी होत चालला आहे. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार लंके हातात तुतारी घेणार की नाही? याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. (Latets Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून आमदार नीलेश लंके हे शरद पवार यांच्या संपर्कात आहे. तसे दोघेही जाहीरपणे समोरासमोर आले. समोरासमोर येऊन देखील एकमेकांनी पक्ष प्रवेशावर भाष्य केले नाही. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील उपस्थित होती. यानिमित्ताने आमदार लंकेंना 'तुतारी' भेट देण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आमदार नीलेश लंके हे शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याचे संकेत दिले होते. यावर आमदार लंकेंनी दोन्ही बाजूने सावध पवित्रा घेत अजूनही जाहीर केलेले नाही. त्यामुळे आमदार लंकेंच्या शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाबाबत आणि नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संभ्रम कायम आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

असे असले, तरी आमदार लंके (Nilesh Lankhe) यांनी सोशल मीडियावर 'घड्याळ' चिन्हाचा वापर कमी केला आहे. 'एक्स' खात्यावरील डीपी फोटो आमदार लंकेंचा आहे. त्यावर मात्र 'घड्याळ' चिन्ह दिसते. दिनविशेषच्या निमित्ताने ते खात्यावर करत असलेल्या पोस्टवरील स्ट्रीपमध्ये नावासह 'घड्याळ' चिन्ह वापरायचे. मात्र गेल्या दोन पोस्टमध्ये त्यांनी 'घड्याळ' चिन्ह वापरलेले नाही.

Nilesh Lankhe News :  Ahmednagar Politics
Sunil Tatkare On NCP Crisis : 'अटी-शर्थींसह 'घड्याळ' वापरणार का?' कोर्टाच्या निर्णयावर तटकरे म्हणाले....

यातच शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यावेळी विजयाची तुतारी वाजणारच असा दावा केला आहे. हा दावा करताना त्यांचा रोख आमदार नीलेश लंकेंच्या उमेदवारीकडे होता. 'आमदार लंके हे तुतारी हातात घेतील की नाही, यावर मी भाष्य करणार नाही. तसे करून त्यांना अडचणीत आणणार नाही. परंतु यावेळी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विजयाची तुतारी वाजणारच आहे. आम्ही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ जिंकल्याशिवाय गप्प बसणार नाही', असेही जयंत पाटील यांनी म्हटले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com