Yogendra Yadav  Sarkarnama
महाराष्ट्र

Yogendra Yadav : महायुती की आघाडी, विधानसभेला कोण मारणार मुसंडी? योगेंद्र यादवांनी केली मोठी भविष्यवाणी

Yogendra Yadav Predicts on Maha Vikas Aghadi And Mahayuti Future in Maharashtra : लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रकाश आंबेडकरांनी जे काही केलं, ते जनतेला आवडलं नाही, अशी नाराजी योगेंद्र यादवांनी व्यक्त केली.

Akshay Sabale

लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर ( Prashant Kishor ) आणि राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी 'एनडीए' आणि 'इंडिया' आघाडीबाबत वेगवेगळे दावे केले होते. पण, योगेंद्र यादव यांनी केलेली भविष्यवाणी खरी झाल्याचं दिसत आहे. त्याच्या दाव्यांसमोर 'एक्झिट' पोलही फिके पडले आहेत.

यातच लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्र विधानसभेला परिणाम होण्याची शक्यता योगेंद्र यादव यांनी वर्तवली आहे. तसेच, उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांचं नेतृत्व स्वीकारलं, तर महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, असं मोठं विधानही यादव यांनी केलं आहे.

योगेंद्र यादव ( Yogendra Yadav ) म्हणाले, "महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लोकसभा निकालाचा परिणाम आणखी जास्त होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत मोदी फॅक्टर कमी होईल. किमान 2 ते 5 टक्के मते कमी होतील. जर महाविकास आघाडी एकत्रित लढत असेल आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारलं जात असेल, तर स्पष्टपणे बहुमत महाविकास आघाडीला मिळू शकते."

"ज्याप्रकारे शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पडली आणि मागील दरवाजानं सरकार बनवलं गेलं, त्यामुळे जनतेत नाराजी होती. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा सुफडासाफ होईल, असा माझा अंदाज होता. पण, तो खोटा ठरला. मात्र, खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणती हे निकालातून दिसून आलं. ज्यांना निवडणूक आयोगानं चिन्ह दिलं ते खोटे आणि ज्यांना नाही दिले ते खरे आहेत, हे निवडणुकीतून सिद्ध झालं," असं योगेंद्र यादव यांनी सांगितलं.

"लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रकाश आंबेडकरांनी जे काही केलं, ते जनतेला आवडलं नाही. विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी महाविकास आघाडीसोबत आली तर महायुती सत्तेत येण्याचा प्रश्नच येत नाही. पण, प्रकाश आंबेडकर आले नाही तरीही महाविकास आघाडी विधानसभेला पुढे असेल," असंही यादव यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT