Youth Congress protest Delhi AI Summit : युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नवी दिल्ली इथला ‘इंडिया एआय इंपॅक्ट समिट-2026’ मध्ये अंगातील सदरे काढून बेरोजगारीवर लक्ष वेधलं. युवक काँग्रेसचं हे आंदोलन राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) चांगलाच जिव्हारी लागलं. युवक काँग्रेसच्या या अनोख्या आंदोलनाचे पडसाद देशभर उमटले. पंतप्रधान नरेंद्र मोदीसह भाजपच्या सर्वच नेत्यांनी याचा युवक काँग्रेसचा आंदोलनाचा निषेध करत, हा देशद्रोह, देशाचा अपमान असल्याचं म्हटलं.
या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनावेळी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी, दिल्लीतील AI परिषदेत युवक काँग्रेसने 'चड्डी बनियन गँग'सारखी , अशी कोणती कृती होऊ नये, असा सूचक इशारा शिवसेना नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अशी महायुती सत्ताधाऱ्यांची पत्र परिषद झाली. या पत्र परिषदेत एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय एआय समिटमध्ये युवक काँग्रेसने केलेल्या आंदोलनावर भाष्य केलं.
आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये असे आंदोलन म्हणजे, युवक काँग्रेसची (Congress) ही कृती देशद्रोह, देशाचा अपमान असल्याचं सांगताना, एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी अशी कोणतीही कृती करू नये, सभागृहात येऊन चर्चा, असे म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, "दिल्लीमध्ये एआय समिट होतं. जगभरात लोकं भारत मंडपम मध्ये होते. देशासाठी सकारात्मक चित्र होतं. यातून देश पुढं जात असल्याची भावना होती. पण तिथं चड्डी बनियान गँग आली. हा प्रकार सर्वांनीच पाहिला. त्यांनी त्यांची अब्रू वेशीवर टांगली आहे. परंतु देशाचं देखील अपमान करण्याचा प्रयत्न केला."
'युवक काँग्रेसचे हे देशप्रेम आहे का? ही देशभक्ती आहे? पण हा देशद्रोहच आहे, देशाची बदनामी करण्यासाठी हे घडवून आणायचं. पंतप्रधान यांची बदनामी करायची. राहुल गांधी देशात अन् विदेशात गेल्यावर तिथं देखील देशाची अन् पंतप्रधानांची बदनामी करतात,' असा एकनाथ शिंदे यांनी घणाघात केला.
'युवक काँग्रेसच्या आंदोलनावर पुन्हा एकदा हे कुठलं देशप्रेम, हा देशद्रोह असा ठामपण सांगताना, एकनाथ शिंदे यांनी या अधिवेशनात विरोधकांकडून, अशी कोणतीही कृती पायऱ्यांवर होऊ नये. उलट सभागृहात या. सरकार सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. सर्वसामान्यांसाठी विरोधी पक्षाने भांडायचे असते. भारत मंडपम सारखी कृती आम्हाला अपेक्षित नाही,' असे स्पष्ट केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.