

Maharashtra Municipal Elections : मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची होत असलेल्या पिछेहाटवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. भिवंडी न्यायालयात हजर राहण्यासाठी आलेल्या राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक घेत ही नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आगामी काळात काँग्रेसच्या संघटन बळकटीकरण अन् आक्रमक जनसंपर्क करणाऱ्यांवरच पक्षाकडून जास्त जबाबदारी दिली जाईल, असे सूचक संकेत राहुल गांधी यांनी नेत्यांच्या बैठकीत दिले. राहुल गांधी यांची ही थोड्यात पण आक्रमक बैठक, आगामी काळात महाराष्ट्रातील काँग्रेस संघटनेतील बदल तर नव्हे ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या निराशाजनक कामगिरीचा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आढावा घेतला. राहुल गांधी (Rahul Gandhi) हे भिंवडी न्यायालयात एका खटल्यासाठी महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी त्यांनी पक्ष संघटनेची बैठक मुंबईमधील एका हॉटेलमध्ये घेतली.
या बैठकीत महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती तसेच काँग्रेस (Congress) पक्षाच्या संघटन बळकटीसाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा केली. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र वार पक्ष या मित्र पक्षांसोबत आगामी काळात निवडणूक न लढविणे योग्य की अयोग्य यावरसुद्धा विचार मंथन केले.
राहुल गांधी यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. मुंबईत 227 जागांपैकी केवळ 24 जागांवर विजय मिळाल्याने पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का? आक्रमक संघटन ठेवण्यासाठी काय बदल करायचे आहेत का? असा थेट सवाल या बैठकीत राहुल गांधींनी केला. या प्रश्नांवर बैठकीला उपस्थित असलेल्या नेते तोंडघशी पडले.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह मुंबई शहर अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड उपस्थित होते. या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी सपकाळ यांच्याशी संघटनामक रचना, कार्यकर्त्यांची स्थिती व आगामी निवडणुकांची रणनीती यावर चर्चा केली. पक्षाचे संघटन मजबूत संपर्क करण्याबरोबरच, कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे, तसेच स्थानिक पातळीवर आक्रमकपणे जनसंपर्क वाढवण्याच्या सूचना राहुल गांधी यांनी केल्या.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला राज्यात 300 पेक्षा जास्त मिळतील असा अंदाज व्यक्त केला. तसंच पाच महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता येईल, असं भाकीत केलं होतं. परंतु प्रत्यक्षात काँग्रेसला महाराष्ट्रात सुमारे 160 जागांवर विजय झाला आहे. सत्ताधाऱ्यांबरोबर लढतीत काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सर्वच अंदाज चुकले. यामुळे राहुल गांधी यांनी ग्राऊंडवर जाऊन, पण आक्रमक काम करण्याचा सल्ला दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.