Maharashtra Gram Vikas Department issues circular directing newly elected Zilla Parishads to complete President and Vice President selection process before March 20. Sarkarnama
महाराष्ट्र

मोठी बातमी : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा मुहूर्त ठरला; ग्रामविकास विभागाकडून तारीख घोषित; राजकीय घडामोडींना वेग

12 Zilla Parishad President Election : ग्रामविकास विभागाने 12 जिल्हा परिषदांना 20 मार्चपूर्वी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीनंतर जिल्हास्तरीय सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचाली वेग घेत आहेत.

Rahul Gadkar

Maharashtra Gram Vikas Department Order : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. पण २ आठवडे उलटल्यानंतरही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापतीची निवड अद्याप झालेली नाही. त्यामुळे सर्वांच्या नजरा या अध्यक्ष निवडीकडे लावून राहिल्या होत्या.

अखेर बुधवारी (ता. 25) राज्याच्या ग्रामविकास विभागाने याबाबतचे परिपत्रक जारी कले असून १२ जिल्हा परिषद व पंचायत समितींना २० मार्चपूर्वी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड करण्यासाठी बैठक घ्यावी अशा सूचना अवर सचिव बा.म. आसोले यांनी दिल्या आहेत.

राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि परभणी या १२ जिल्हा परिषद आणि इथल्या १२५ पंचायत समितीच्या निवडणुका ७ फेब्रुवारी रोजी पार पडल्या होत्या. ९ फेब्रुवारी रोजी याचा निकाल जाहीर झाला. पण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड कधी होणार याची उत्कंठा सर्वांना लागली होती.

अखेर ग्रामविकास विभागाकडून आज (ता. २५) सर्वच जिल्हा परिषदेला २० मार्चपूर्वी सर्व पदाधिकारी निवड प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये तालुकास्तरावर महायुती काही ठिकाणी स्वतंत्र लढली होती. तर सांगलीमध्येही महायुती काही ठिकाणी घटक पक्षांच्या विरोधात होती. मात्र निवडणूक पार पडल्यानंतर कोल्हापुरात महायुतीचे सर्वच नेते एकत्र येत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा परिषदेवर होईल असा अंदाज व्यक्त केला जात असताना भाजपने देखील अध्यक्षपदावर दावा केला आहे. तर सांगलीमध्ये भाजपला वगळूनच राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना एकत्र येत सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT