

शिवकुमार यांनी चिक्कबळ्ळापूर येथील मनरेगा बचाव सभेत भाजपवर जोरदार टीका केली.
त्यांनी भाजप आपले अखेरचे दिवस अनुभवत असल्याचा दावा करत राजकीय वातावरण तापवले.
या वक्तव्यामुळे भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
karnataka MNREGA News : ‘विझण्यापूर्वी ज्याप्रमाणे दिवा तेजाने पेटतो, त्याप्रमाणे भाजप आपले अखेरचे दिवस अनुभवत आहे. त्यांचा शेवट जवळ आला आहे,’ असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार विखारी टीका केली आहे. ते ‘चिक्कबळ्ळापूर येथे आयोजित ‘मनरेगा बचाव’ सभेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, देश वाचवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेसने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) द्वारे ग्रामीण जनतेला रोजगाराची हमी दिली. मात्र, केंद्र सरकार ही योजना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘मनरेगा आणि महात्मा गांधींची परंपरा वाचवणे गरजेचे आहे.
या योजनेअंतर्गत कोणती कामे घ्यायची, याचा निर्णय घेण्याचा अधिकार पंचायतींना देण्यात आला होता. राज्यातील ५,९०० पंचायतींमध्ये प्रत्येकी १ ते २ कोटींची कामे मंजूर केली होती. मनरेगा ही शेतकरी व कामगारांना आत्मविश्वास देणारी योजना आहे. आमचे सरकार पंचायत कार्यालयांना महात्मा गांधींचे नाव देण्याचा निर्णय घेत आहे.
नवीन योजनेनुसार राज्यांना ४० टक्के खर्च उचलावा लागणार असून, भाजपशासित राज्यांनाही ती राबवणे कठीण जाईल, असा दावा त्यांनी केला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप आमच्या पंचहमी योजनांवर टीका करत होते; पण नंतर त्यांनी आमची नक्कल केली. मतदारांचे हक्क जसे हिरावले जात आहेत, तसेच रोजगाराचे हक्कही काढून घेतले जात आहेत. मनरेगा पूर्ववत होईपर्यंत आमचा लढा सुरू राहील,’ असे ते म्हणाले.
मुलांकडून मोबाईलचा गैरवापर म्हणूनच...
१६ वर्षांखालील मुलांच्या मोबाईल वापरावरील बंदीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मुलांकडून मोबाईलचा गैरवापर होत असल्याबाबत पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे शाळांमध्ये मोबाईल वापरास बंदी घालण्यात आली आहे.
1. डी. के. शिवकुमार यांनी हे वक्तव्य कुठे केले?
चिक्कबळ्ळापूर येथे आयोजित मनरेगा बचाव सभेत केले.
2. त्यांनी भाजपबाबत काय म्हटले?
भाजपचा शेवट जवळ आला असून पक्ष अखेरचे दिवस अनुभवत आहे, असे त्यांनी म्हटले.
3. ही सभा कोणत्या मुद्द्यावर आयोजित करण्यात आली होती?
मनरेगा योजनेच्या बचावासाठी सभा आयोजित करण्यात आली होती.
4. शिवकुमार कोणत्या पदावर आहेत?
ते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आहेत.
5. या वक्तव्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.