Maharashtra Zilla Parishad elections 2026 Sarkarnama
महाराष्ट्र

ZP Elections 2026 : काँग्रेसला नवा भिडू मिळाला: ZP एकत्र लढणार, भाजपची डोकेदुखी वाढणार; ग्रामीण भागाचे राजकारण बदलणार

Congress and OBC Bahujan Party alliance for Zilla Parishad elections: ओबीसी बहुजन पक्षाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर आघाडीबाबत दोन्ही पक्षामध्ये एकमत झाले.

Mangesh Mahale

Zilla Parishad Election Congress OBC Alliance: महापालिका निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता ग्रामीण भागातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख पक्ष तयारीला लागले आहेत.

राज्याच्या राजकारणात एका नव्या पक्षाची जोरदार एन्ट्री झाली आहे. ‘ओबीसी बहुजन आघाडी’ या नव्या राजकीय पक्षाने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढवण्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

महापालिका निवडणुकीनंतर आता 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होत आहे. 7 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. महापालिका निवडणुकीत वरचढ ठरलेल्या भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे.

ओबीसी नेते, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन पक्षासोबत काँग्रेसने आघाडी केली आहे. "ही एक वैचारिक आघाडी असून आगामी जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढू,'' अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

ओबीसी बहुजन पक्षाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी त्यांचे सहकारी चंद्रकांत बावकर, जे. टी. तांडेल, पांडुरंग मिरगळ यांनी मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर आघाडीबाबत दोन्ही पक्षामध्ये एकमत झाले.

ओबीसी आरक्षणाचे लचके तोडण्याचे काम केले जात असून २७ टक्के आरक्षणावरही घाला घातला जात आहे. जीआर वर जीआर काढले जात आहेत, पण कोणत्याच समाजाला त्याचा फायदा होत नाही. ओबीसी समाजाला न्याय मिळावा यासाठी स्वतंत्र पक्षाची स्थापना करुन समविचारी पक्षाशी आघाडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे,असे शेंडगे यांनी म्हटले आहे.

जातनिहाय जनगणनेची भूमिका घेतल्याबद्दल राहुल गांधी यांचे आम्ही आभार मानतो. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालीच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केला.

सत्ता आल्यावर पहिली सही धनगर समाजाच्या आरक्षणाची करेन, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये २०१४ साली दिले होते पण आजपर्यंत त्याची पूर्तता केलेली नाही. फडणवीस यांनी धनगर, ओबीसी, मराठा, आदिवासी समाजाची आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक केली आहे. जाती जातीत भांडणे लावण्याचे काम त्यांनी केले आहे. या समाजाचा भाजपा व फडणवीस यांच्यावरचा विश्वास उडाला आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT