SSC HSC Practical Exam: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यासाठी महत्वाची बातमी; परीक्षेला काही दिवस शिल्लक असतानाच बोर्डाचा मोठा निर्णय

Maharashtra Board Big Decision for SSC & HSC Students:परीक्षेसाठी नेमण्यात आलेल्या बाह्य परीक्षकांची आता सरमिसळ करून विश्वासार्हता वाढवली जाणार आहे, यामुळे विद्यार्थ्यांना खरे गुण मिळतील आणि परीक्षा प्रक्रिया पारदर्शक होईल, असा यामागे बोर्डाच उद्देश आहे.
SSC, HSC exams
SSC, HSC examsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra board exam announcement: दहावी-बारावीच्या परीक्षेला काही दिवस शिल्लक आहे. प्रात्यक्षिक परीक्षांसंदर्भात महाराष्ट्र बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. या बाबत संबधीत शाळांना आदेश देण्यात आले आहेत. परीक्षेत कॉपी टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात येते. असेच भरारी पथक आता प्रात्यक्षिक परीक्षेसाठी नेमण्यात आले आहे.

लेखी आणि प्रात्यक्षिकपरीक्षेत कॉपी किंवा इतर अनियमितता पूर्णपणे थांबवाव्यात, यासाठी बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. प्रात्यक्षिक परीक्षेत काही केंद्रांवर असे प्रकार यापूर्वी आढळले होते. असे प्रकार पुन्हा होऊ नये, म्हणून बोर्डाने कठोर उपाययोजना केली आहे.

परीक्षेसाठी नेमण्यात आलेल्या बाह्य परीक्षकांची आता सरमिसळ करून विश्वासार्हता वाढवली जाणार आहे, यामुळे विद्यार्थ्यांना खरे गुण मिळतील आणि परीक्षा प्रक्रिया पारदर्शक होईल, असा यामागे बोर्डाच उद्देश आहे. उपायांमुळे परीक्षेतील अनियमितता पूर्णपणे बंद होतील, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

बाह्य परीक्षकांची यंदा पहिल्यांदाच अदलाबदल केली जाणार आहे. खासगी किंवा विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना सरकारी अनुदानित शाळांमध्ये, तर अनुदानित शाळांमधील शिक्षकांना खासगी शाळांमध्ये बाह्य परीक्षक म्हणून पाठविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे भरारी पथकाला शाळांमधील प्रयोगशाळांची छायाचित्रे, जर्नल, विद्यार्थी प्रयोग करतानाचे छायाचित्रे काढून मंडळाला पाठवायची आहेत.

SSC, HSC exams
Eknath Shinde: ‘काम नाही तर खुर्ची नाही! शिंदेंचा अ‍ॅक्शन प्लॅन! महापालिकेत 'नापास' मंत्र्यांची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी? नव्या चेहऱ्यांना संधी देणार

यासाठी बाह्य परीक्षकांसाठी एक विशेष उद्बोधन वर्ग नुकताच आयोजित करण्यात आला होता. या वर्गात परीक्षकांना प्रात्यक्षिकांमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी तपासायच्या, गुण कसे द्यायचे, नियम काय आहेत, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

परीक्षा केंद्रांसाठी नवे कठोर नियम

  • केंद्रांवर पक्के भिंतीचे कंपाउंड, स्वच्छ स्वच्छतागृहे, पाण्याची व्यवस्था आणि प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आले आहेत.

  • भिंत पडलेली असल्यास लोखंडी जाळी लावण्याचे सांगण्यात आले आहे. पर्यवेक्षकांच्या मोबाईल कॅमेऱ्यांना झूमद्वारे जोडले जाणार आहे.

  • वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व हालचालीवर लक्ष ठेवणार. परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास परीक्षा केंद्रांची मान्यता कायमची रद्द होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com