Santosh Deshmukh, Uddhav Thackeray Sarkarnama
मुख्य बातम्या

Uddhav Thackeray मस्साजोगला जाणार? धनंजय देशमुखांच्या भेटीनंतर बड्या नेत्याचा दावा

Uddhav Thackeray may Visit Late Sarpanch Santosh Deshmukh’s Residence in massajog शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मस्साजोगला दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी जाणार

Hrishikesh Nalagune

Santosh Deshmukh News : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मस्साजोगला येण्याची मानसिकता आहे. येत्या काही दिवसांत ते इथे भेट देऊ शकतात, असा दावा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केला. ते मस्साजोग येथे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली आणि त्यांचीशी चर्चाही केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

बबनराव घोलप म्हणाले, देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलो आहे. आम्हाला माध्यमांमधून जी काही माहिती मिळती ती फार गंभीर आहे. देशमुख कुटुंबाला धीर देणे आणि त्यांच्या पाठीमागे उभे राहणे, हे आमचे कर्तव्य आहे. म्हणून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि चर्मकार संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांची मस्साजोगला येण्याची मानसिकता आहे, असेही त्यांनी सांगितले.

सुरेश धस यांची मस्साजोगला भेट :

भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांनीही शनिवारी मस्साजोगला दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी भेट दिली. तिथे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यावेळी माध्यमांशी बोलताना धस यांनी राज्य सरकारकडे आठ प्रमुख मागण्या केल्या.

बीड जिल्ह्यात केवळ अधिक्षक बदलून उपयोग नाही, अतिरिक्त अधिक्षक म्हणून पंकज कुमावत यांची नियुक्ती करावी, विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी धस यांनी केली. यावेळी वाल्मिक कराड (Walmik Karad) याला मिळणाऱ्या तुरुंगातील व्हीआयपी ट्रिटमेंवरही त्यांनी भाष्य केले. वाल्मिक कराडला चहा कोण आणून देते? जेवण कोण आणून देते? काही लोकांना मटण-चिकन कसे पोहोचते? असा सवाल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT