sharad pawar, Eknath shinde sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय..

Sharad Pawar : संपकरी आंदोलकांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचं नाव घेतलं होतं. यानंतर सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एसटीच्या (ST Employee) विलिनीकरण आणि पगारवाढीच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला संप जवळपास सहा महिने सुरु होता. मागण्या मान्य होत नसल्याने आक्रमक झालेल्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हरओक (SilverOak) या निवासस्थानी हल्ला चढवला होता. पवार यांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली होती. याप्रकरणी ११८ कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला करणाऱ्या या ११८ बडतर्फ कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संपकरी आंदोलकांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचं नाव घेतलं होतं. यानंतर सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कष्टकऱ्यांप्रती कळवळा आहे. 118 कर्मचारी डंके की चोटपर कामावर रुजू झालेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाने कर्मचारी सन्मामपूर्वक पुन्हा सेवेत आलेत,"

अचानक घडलेल्या या घनटेचे राजकीय वर्तुळात चांगलेच पडसाद उमटले होते. या घटनेनंतर तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी 118 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT