PMC : दिवाळीपूर्वीच महापालिकेत फटाक्यांची वात पेटली.. ; स्टॅालसाठी राडा

PMC : महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने यंदा ३५ स्टॉल भाड्याने देण्यासाठी अर्ज मागविले होते. त्यासाठी ६६ जणांनी जागेसाठी अर्ज केले होते.
PMC latest news
PMC latest newssarkarnama
Published on
Updated on

पुणे :दिवाळीपूर्वीच महापालिकेत फटाके उडल्याची घटना शुक्रवारी घडली. शनिवार पेठेतील वर्तक बाग येथील जागा फटाका स्टॅालसाठी भाड्याने देण्यासाठी व्यावसायिकांची बैठक महापालिकेत झाली.

या बैठकीत वाद झाल्याने अधिकारी, सुरक्षारक्षक निघून गेले. हा वाद सुरु असताना शिवीगाळ करणाऱ्यांना हुसकावून लावण्यासाठी सुरक्षा कर्मचारीही तेथे नसल्याचे दिसून आले.उपस्थितांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला.

शनिवार पेठेतील वर्तक बाग येथील जागा पुणे महापालिकेतर्फे फटाका स्टॉलसाठी भाड्याने देण्यासाठी लिलाव करण्यात आला. मात्र, या लिलावात काही जणांनी दादागिरी करून बोली लावू न देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला.

PMC latest news
Chitra Wagh : मुख्यमंत्र्यांच्या दीड वर्षांच्या नातवाला राजकारणात ओढतात ? ; चित्रा वाघांनी ठाकरेंना फटकारलं

पुणे महापालिकेतर्फे दिवाळीमध्ये फटाके विक्रीसाठी व्यावसायिकांनी दुकान लावण्यासाठी जागा भाड्याने दिली जाते. गेल्या काही वर्षापासून शनिवार पेठेतील वर्तक बागेच्या शेजारी नदी काठच्या रस्त्यावर स्टॉल लावले जातात. यंदाही या जागांसाठी लिलाव करण्यात आला. यावरुन वाद झाला. महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने यंदा ३५ स्टॉल भाड्याने देण्यासाठी अर्ज मागविले होते. त्यासाठी ६६ जणांनी जागेसाठी अर्ज केले होते.

यासाठी झालेल्या लिलावातून महापालिकेला १४ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.एका स्टॉलसाठी सर्वाधिक १ लाख १० हजाराची बोली लावण्यात आली. आरोग्य विभागाजवळील वडके हॉलमध्ये लिलाव प्रक्रिया झाली. यावेळी झालेल्या वादात शिवीगाळ करण्यात आली. तेव्हा जवळच्या विभागात अनेक महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com