Sanjay Raut Press conference  
मुंबई

पीएमसी बॅंक मी पाहिलीही नाही

पीएमसी बॅंक घोटाळ्यातील राकेश वाधवान किरीट सोमय्यांच्या मुलाचा पार्टनर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी केंद्रातील भाजप सरकार, केंद्रातील भाजप (BJP) नेते, राज्यातील भाजप पक्ष आणि भाजपचे नेते यांच्यावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्याची सुरुवात त्यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यापासून केली. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हा मुलुंडचा दलाल आहे, भडवा आहे. तो मराठी भाषेच्या विरोधात कोर्टात गेला होता, असा आरोप करत त्यांनी किरीट सोमय्या यांना लक्ष्य केले.

महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या आज मुंबई भाजपचा चेहरा आहेत. पण त्यांना विचारा निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कोणाची आहे. महाआयटीमध्ये २५ कोटींचा घोटाळा झाला. फडणवीसांच्या काळात सर्वात मोठा घोटाळा झाला. पीएमसी बॅंक घोटाळा. माझं त्या बॅंकेत खातंही नाही, ती बॅंक मी पाहिलीही नाही. माझ्याकडे पाच हजार कोटींचा घोटाळ्याचा हिशोब आहे. पण मला त्रास देण्यासाठी मला, माझ्या कुटुंबियांना, नातेवाईकांना त्रास दिला गेला.

निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ही राकेश वाधवान ची आहे. जो किरीट सोमय्या यांचा मुलगा निल सोमय्यांचा पार्टनर आहे. पीएमसी बॅंक घोटाळ्याचे पैसे राकेश वाधवानच्या अकाऊंटला २० कोटी गेले. २० कोटींचा निधी भाजपला दिला. राकेश वाधवान यांचा किरीट सोमय्या आणि भाजपशी आर्थिक संबंध आहे. हा भ्रष्टाचाराविरु्ध लढणारा माणूस स्वतच भ्रष्टाचारी आहे. पण महाविकास आघाडीतील नेत्यांवर, ठाकरे कुटुंबियांवर, पवार कुटुंबियावर, त्यांच्या नातेवाईकांवर आरोप करायचे, त्यांना त्रास द्यायचा आणि आपला भ्रष्टाचार लपवायचा असे धंदे सुरु आहेत.

संजय राऊत म्हणाले, ठाकरे कुटुंबियांनी अलिबागजवळील कोरलाई गावात १९ बंगले बांधले आहेत, असा सोमय्यांनी आरोप केला. पण माझं सोमय्या दलालाला माझं आव्हान आहे, आपण सगळ्या पत्रकारांना घेवून त्या बंगाल्याची पिकनिक काढू आणि जर तिथं हे बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन आणि नाही दिसले तर आख्खी शिवसेना त्या दलालाला चपलेने मारणार, असे आव्हान त्यांनी दिले. खोटेपणा, भंपकपणा, मराठी माणसाविषयीचा द्वेष यातून दिसतो, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT