मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी केंद्रातील भाजप सरकार, केंद्रातील भाजप नेते, राज्यातील भाजप पक्ष आणि भाजपचे नेते यांच्यावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्याची सुरुवात त्यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यापासून केली. किरीट सोमय्या हा मुलुंडचा दलाल आहे, भडवा आहे. तो मराठी भाषेच्या विरोधात कोर्टात गेला होता, असा आरोप करत त्यांनी किरीट सोमय्या यांना लक्ष्य केले.
संजय राऊत म्हणाले, ठाकरे कुटुंबियांनी अलिबागजवळील कोरलाई गावात १९ बंगले बांधले आहेत, असा सोमय्यांनी आरोप केला. पण माझं सोमय्या दलालाला माझं आव्हान आहे, आपण सगळ्या पत्रकारांना घेवून त्या बंगाल्याची पिकनिक काढू आणि जर तिथं हे बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन आणि नाही दिसले तर आख्खी शिवसेना त्या दलालाला चपलेने मारणार, असे आव्हान त्यांनी दिले. खोटेपणा, भंपकपणा, मराठी माणसाविषयीचा द्वेष यातून दिसतो, असेही ते म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे सासरे सु. ल. पाटणकर यांनी कर्जतमध्ये देवस्थानची जागा घेतल्याचा आरोप या भडव्याने केला होता. पाटणकरांनी जमीन विकत घेतल्याबद्दल मी त्याला आव्हान दिले होते. मात्र आज मी स्पष्ट करतो की, बाराव्या खरेदीदाराकडून पाटणकर यांनी जमीन घेतली आहे. देवस्थानाकडून आम्ही खरेदी केली आहे का? तर अजिबात नाही. त्यांनी केलेला प्रत्येक आरोप खोटा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.