Lok Sabha Election 2024 voting Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 voting : महाराष्ट्रात दुपारी 1 पर्यंत सरासरी 31.55 टक्के मतदान; कोल्हापुरात सर्वाधिक, माढ्यात सर्वांत कमी मतदान

Vijaykumar Dudhale

Mumbai, 07 May : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ जागांसाठी मंगळवारी सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. वाढत्या उन्हाचा प्रभाव लक्षात घेता सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर गर्दी दिसून येत होती, त्यामुळेच दुपारी एकपर्यंत महाराष्ट्रात सरासरी 31.55 टक्के मतदान मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान कोल्हापूर मतदासंघात झाले असून सर्वात कमी मतदानाची नोंद माढा लोकसभा मतदारसंघात झाली आहे.

महाराष्ट्रात अकरा जागांसाठी आज (ता. 07 मे) मतदान आहेत. राज्यातील लातूर, सांगली, बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, माढा, धाराशिव, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर या मतदारसंघातील उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा फैसाला मतदारांच्या हाती आहे. सकाळी सातपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही भागांत सध्या उष्णतेची लाट आहे. त्याचा मतदानावरील संभाव्य परिणाम लक्षात घेता प्रशासनाने उपाय योजना केल्या आहेत. मात्र, त्याही अपुऱ्या पडत असल्याचे दिसून येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन सकाळच्या वेळीच जास्तीत जास्त मतदान उरकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सकाळपासूनच मतदानाची सरासरी टक्केवारी कायम आहे. त्यानुसार दुपारी एकपर्यंत महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदान झाले आहे. संध्याकाळी सहापर्यंत मतदान करता येणार आहे, त्यामुळे उन्हाची तीव्रता थोडी कमी झाल्यानंतर पुन्हा मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 38.42 टक्के, तर त्याखालोखाल हातकणंगले मतदारसंघात 36.17 टक्के मतदान झाले आहे. सर्वांत कमी मतदान माढा लोकसभा मतदारसंघात 26.61 टक्के झाले आहे, तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात सोलापूर 29.32 टक्के मतदान झाले आहे.

दुपारी एकपर्यंत लातूरमध्ये 32.71 टक्के, सांगलीत 29.65 टक्के, बारामतीमध्ये 27.55 टक्के, हातकणंगले मतदारसंघात 36.17 टक्के, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 38.42 टक्के, माढ्यात 26.61 टक्के, धाराशिवमध्ये 30.54 टक्के, रायगडमध्ये 31.34 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये 33.19 टक्के, सातारा लोकसभा मतदारसंघात 32.78 टक्के, तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात 29.32 टक्के मतदान झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT