पुणे : पुण्यातील व्यावयासिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) आणि संजय छाब्रिया यांच्या मालमत्तेवर ईडीनं येस बँक घोटाळा प्रकरणी कारवाई केली आहे. अविनाश भोसलेंची 164 कोटी तर संजय छाब्रिया यांची 251 संपत्ती जप्त करण्यात आली आहे. (ed latest news)
दोन दिवसाआधी सीबीआयने अविनाश भोसले यांना सर्वात मोठा दणका देत त्यांचे हेलिकॉप्टरही जप्त केलं आहे. अविनाश भोसले (Avinash Bhosale) आणि संजय छाब्रिया दोघांची मिळून 415 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
अविनाश भोसले यांचा मुंबईतील ड्यप्लेक्स फ्लॅट जप्त केला गेला आहे. छाब्रिया यांची बंगळुरू आणि सांताक्रुझमधील जमीन, सांताक्रुझ तीन कोटींचा फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात ईडीने आतापर्यंत १८२७ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.
संजय छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुपने डीएचएफएलकडून घेतलेल्या दोन हजार कोटी रूपयांच्या कर्जातील २९२ कोटी ५० लाख रुपये भोसले यांच्यामार्फत इतरत्र वळवण्यात आले. दोन कंपन्यांमार्फत ती रक्कम वळवण्यात आल्याचा आरोप आहे.
वरळीतील एक झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातही भोसले यांना सल्ला शुल्क रक्कम मिळाली. प्रकल्पाचा संभाव्य खर्च, वास्तुविशारद व अभियांत्रिकी आराखडा, प्रकल्प बांधकाम व करार, वित्तीय मूल्यांकन व संरचना आदी गोष्टींबाबत भोसले यांच्या कंपन्यांकडून सल्ला देण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते. पण भोसले यांच्या कंपन्यांकडून अशी कोणतीही सुविधा देण्यात आली नसल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले.
भोसले यांनी हजारो कोटींचा घोटाळा करून त्या पैशातून परदेशांत मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप सीबाआयनं केला आहे. तर डीसी मोटर्सचे मालक दिलीप छाब्रिया यांच्या विरोधात ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. ईडीनं नुकतीच मुंबई आणि पुण्यातील सुमारे सहा ठिकाणी याबाबत छापेमारी केली. मुंबई पोलिसांच्या सीआययू युनिट आणि ईओडब्ल्यूने छाब्रिया आणि त्यांच्या कुटुंबियांवर साल 2020 मध्ये नोंदवलेल्या खटल्यांच्या आधारे हा मनी लाँड्रिंगचा गुन्हा नव्यानं दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.