शिवाजी महाराजांची मूर्ती असल्याने वाहन रोखले ? ; तिरुपती देवस्थानाकडून महत्वाचा खुलासा

शिवाजी महाराजांची मूर्ती असल्याने वाहन रोखून धरल्याचा 'व्हिडिओ'पंधरा दिवसापूर्वी व्हायरल झाला होता.
Dharma Reddy, milind-narvekar
Tirumala Tirupati Devsthan
Dharma Reddy, milind-narvekar Tirumala Tirupati Devsthan sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर (तपासणी नाका) एका वाहनात छत्रपती शिवाजी महाराज (Chhtrapati Shivaji Maharaj) यांची मूर्ती असल्याने ते रोखल्यावरून काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात वादाला तोंड फुटले होते. यावर मंदीर प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे. (Tirumala Tirupati Devsthan | Maharashtra | Latest News)

व्यंकटेश्वराच्या दर्शनसाठी जाणाऱ्या एका भाविकाच्या वाहनात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असल्याने वाहन रोखून धरल्याचा 'व्हिडिओ' काही दिवसापूर्वी व्हायरल झाला होता. वाहनाचालकाच्या तक्रारीनंतर महाराष्ट्रात यावरुन तीव्र पडसाद उमटले होते.

या पार्श्वभूमीवर तिरुमला तिरुपती मंदिराचे प्रशासकीय अधिकारी धर्मा रेड्डी यांनी याबाबत मंदीर प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. रेड्डी यांनी देवस्थान परिसरात हिंदू देवतांची व महापुरुषांच्या मूर्ती अडवल्या जात नसल्याचे सांगून हा गैरसमज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

"रेड्डी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आदरपूर्वक स्वीकारली आहे," असे तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य व शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (milind narvekar) यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत नार्वेकरांनी टि्वट करुन हि माहिती दिली आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थानावर नार्वेकर हे विश्वस्त असल्याने या प्रकरणात त्यांनी लक्ष घालून दोषींवर कारवाईची मागणीही करण्यात आली. त्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही नार्वेकरांना फोन करून माहिती घेण्यास सांगितले या फोननंतर लगेचच नार्वेकरांनी देवस्थानचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांच्यासोबत चर्चा करुन या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाईचा आग्रह धरला होता.

Dharma Reddy, milind-narvekar
Tirumala Tirupati Devsthan
गाडीत 'शिवाजी महाराज' असल्याने बालाजीला प्रवेश नाकारला? मिलिंद नार्वेकर मंदिराचे विश्वस्त

महाराष्ट्र अन्य राज्यातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याबाबत नियमावली करण्याची सूचना नार्वेकरांनी रेड्डी यांनी केली होती.या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने चौकशीची तयारी रेड्डी आणि देवस्थानच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी केली.

नार्वेकरांपाठोपाठ देवस्थान समितीवर असलेले महाराष्ट्रातील अमोल काळे, राजेश शर्मा आणि सौरभ बोरा या विश्वस्तांनीही रेड्डी यांच्यासोबत चर्चा केली होती. आज नार्वेकर यांनी रेड्डी यांची भेट घेतली. त्यानंतर रेड्डी यांनी हे स्पष्टीकरण दिलं. चौकशीच्या पहिल्या टप्प्यांत भाषेवरून हा गोंधळ झाल्याचा खुलासा देवस्थानचे अधिकारी-कर्मचारी यांनी केला होता. चौकशीसाठी नार्वेकरांनी पुढाकार घेतला होता. नार्वेकर आणि रेड्डी यांच्यातील चर्चेनंतर आता अशा घटना थांबणार असल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com