Winter Session 2021

 
मुंबई

अधिवेशनात कोरोनाचा शिरकाव; के.सी पाडवींसह ५२ जण कोरोना पॉझिटीव्ह

राज्यात ओमिक्रॉन (Omicron Variant) रुग्णांची संख्या सातत्याने वाढच चालली असून आता तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात (Winter Session) कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती समोर आली आहे. हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत ५२ जणांना कोरोनाची (Covid 19) लागण झाल्याचं समोर आले आहे. २२ डिसेंबरला अधिवेशन सुरु झाल्यापासून २ हजारहून अधिक जणांची कोरोना चाचणी करण्यात आल्या होत्या. त्यांपैकी ५२ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

तर, गेल्या 2 दिवसांत एकूण ३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात मंत्री के. सी. पाडवी,भाजप आमदार समीर मेघे, 3 पत्रकार, पोलीस कर्मचारी, विधिमंडळ आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. के. सी. पाडवी हे विधानसभा अध्यक्षांपदाच्या शर्यतीत असलेल्या उमेदवारांपैकी एक आहेत. ते अधिवेशातही उपस्थित होते. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

बीएमसी कर्मचारी आज (२७ डिसेंबर) त्यांच्या घरी जाऊन पुन्हा त्यांची कोरोना तपासणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्यात कोणतीही लक्षणे अद्याप आढळून आलेली नाहीत. तर आमदार समीर मेघे यांचीही अधिवेशन सुरु होण्यापूर्वी आमदारांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या होत्या, त्यात 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

राज्यासह देशभरात कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा प्रसार सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्यसरकारनांनी खबरदारी म्हणून निर्बंधही लागू करायला सुरुवात केली आहे. मात्र तरीही ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. अशातच राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही कोरोनानं शिरकाव चिंतेचा विषय ठरला आहे.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार, राज्यात ओमिक्रॉनचे ३१ नवे रुग्ण ढळून आले. या 31 रुग्णांपैकी फक्त मुंबईत 27 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पुणे आणि अकोला ग्रामीण भागात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 2 रुग्णांची नोंद झाली आहे.

याशिवाय, पुण्यातील कोथरुड भागातील एमआयटीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या 13 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन्ही डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश जाणार असल्याचा नियम होता. मात्र दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही आता त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT