चिंता वाढली; पुण्यात विद्यापीठातील 13 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

राज्यभरात कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर शाळा-महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत.
Corona

Corona

Sarkarnama

Published on
Updated on

पुणे : कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर राज्यभरातील शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. आता ओमिक्रॉनचा (Omicron) धोका वाढत असल्याने राज्य शासनाच्या आदेशानुसार विविध शहरांत निर्बंध लादण्यास सुरवात झाली आहे. पण शाळा-महाविद्यालये सुरूच आहेत. अशातच पुण्यात एका विद्यापीठातील 13 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

पुणे महापालिकेने (PMC) नुकतीच शहरात कोरोना (Corona) प्रतिबंधक नियमावली लागू केली आहे. शहरात रात्री ९ ते सकाळी ६ या दरम्यान जमावबंदी लागू असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातही राज्य सरकारने (State Government) जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील बहुतेक राज्यांमध्ये शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. आता पुण्यातील कोथरूड मधील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमधील (MIT World Peace University) मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या 13 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

<div class="paragraphs"><p>Corona</p></div>
मोठी बातमी : पुणे शहरात पुन्हा निर्बंध लागू; ओमिक्राॅनचा धसका

एमआयटीचे कुलसचिव प्रशांत दवे (Prashant Dave) यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जात आहे. बाधिते विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील सुप्रा स्पर्धेची तयारी करत होते. त्यापैकी एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर सोबतच्या 25 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. त्यातील 13 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आठ विद्यार्थी निगेटिव्ह आले आहेत इतर चार विद्यार्थ्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. नियमांचे पालन करून प्रवेश दिला जात असल्याने महाविद्यालय बंद केले जाणार नाही, असेही दवे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, राज्यात ओमिक्रॉन रूग्ण वाढत असल्याने राज्य शासनाने शुक्रवारी (ता. २४) सुधारीत नियमावली लागू केली आहे. त्याचे आदेश महापालिकेला मिळाल्यानंतर हे आदेश काढले आहेत. समारंभ, नाट्यगृह, खुल्या आणि बंदिस्त मैदानातील कार्यक्रमासाठी उपस्थितांची संख्या निश्‍चीत केली आहे. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहात १०० नागरिकाची मर्यादा असेल तर खुल्या मैदानात जास्तीत जास्त २५० जण किंवा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्केपेक्षा कमी उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे.

<div class="paragraphs"><p>Corona</p></div>
धोका वाढला..! एका पाठोपाठ एक भाजपशासित राज्यांत रात्रीची संचारबंदी

सामाजिक,राजकीय, धार्मिक कार्यक्रमासाठीही उपस्थितीसाठी हेच बंधन असणार आहेत. हॉटेल, जीम, स्पाच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. आपत्ती निवारण कायद्यानुसार या नियमांचे पालन न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.

मुंबईत कारवाई कठोरपणे

सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी न वापरणाऱ्यांवर कारवाईला मुंबईत वेग घेतला असून पालिकेच्या तिजोरीत कोट्यवधींचा महसूल जमा जमा होत आहे. मुखपट्टी न वापरणाऱ्यांकडून २०० रुपये दंड आकारला जात आहे. यात क्लिनअप मार्शल, मुंबई पोलीस आणि रेल्वे परिसरात केलेल्या कारवाही नुसार आतापर्यंत एकूण ४१ लाख ५६ हजार २९६ जणांकडून ८३ कोटी ६४ लाख ५० हजार ७७१ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे

यात पालिकेच्या वेगवेगळ्या प्रभागात ३३ लाख ६८ हजार ५०९ जणांकडून एकूण ६६ कोटी ८६ लाख ३२ हजार ३७१ दंड गोळा केला आहे. तर मुंबई पोलिसांनी ७ लाख ६३ हजार ८९६ जणांकडून १५ कोटी २७ लाख ७९ हजार २०० रुपये जमा केले आहेत.रेल्वे परिसरात २३ हजार ८९१ जणांकडून ५० लाख ३९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मार्च २०२० पासून ही कारवाई सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com