Amol Kirtikar, Uddhav Thackeray, Ravindra Waikar  Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : वायकरांच्या विजयावर आक्षेप घेणाऱ्या ठाकरे गटालाच मोठा धक्का, मतमोजणी केंद्रात त्यांचाच आमदार...

Ravindra Waikar Vs Amol Kirtikar : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालावर शिवसेना ठाकरे गटाने संशय व्यक्त केला आहे. शिवाय या मतदारसंघाच्या मतमोजणीवेळी 'ईव्हीएम'मध्ये छेडछाड केल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 17 June : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या निकालावर शिवसेना ठाकरे गटाने संशय व्यक्त केला आहे. शिवाय येथील मतमोजणीवेळी 'ईव्हीएम'मध्ये छेडछाड केल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणी आता ठाकरे गटालाच मोठा धक्का बसला आहे.

कारण मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या दिवशी नेस्को येथील मतमोजणी केंद्रात विनापरवानगी प्रवेश केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मतदारसंघातून शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा केवळ 48 मतांननी विजय झाला. मात्र या निकालावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. मतमोजणी केंद्रात 'ईव्हीएम'शी छेडछाड केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. एकीकडे मतमोजणी केंद्रात 'ईव्हीएम'शी संबंधित मोबाईल वापरल्याप्रकरणी वायकर यांच्या मेहुण्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्याविरोधात वनराई पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एका पेपरने वायकर यांच्या मेहुण्याने ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी 'ओटीपी' येणारा मोबाइल वापरल्याचा आरोप केला होता. मात्र, आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. शिवाय मतदान यंत्रणा अनलॉक करण्यासाठी मोबाइलवर ओटीपी येत नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. त्यानंतर विरोधकांनी खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केली आहे.

संजय निरुपम म्हणाले, "ज्या पेपरने 'ईव्हीएम'बाबत बातमी छापली होती त्यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे आता देशभरातील ज्या ज्या नेत्यांनी या संदर्भात ट्विट केलं होतं त्यांनी माफी मागावी. अखिलेश यादव, तेजस्वी यादव, प्रशांत भूषण, आदित्य ठाकरे यांच्यासह ज्यांनी ज्यांनी या खोट्या बातमीचा वापर करून राजकारण केलं त्या सर्वांनी दिलगिरी व्यक्त करावी. राहुल गांधी यांनी देखील या फेक 'नॅरेटीव्ह'बाबत माफी मागावी."

ठाकरे गटाचा निवडणूक अधिकाऱ्यांवर संशय

ठाकरे गटाने मतमोजणीच्या काळातील सीसीटीव्ही फुटेज जारी करण्याची मागणी केली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांच्या मागणीची अद्याप दखल घेतली नाही. याच सर्व पार्श्वभूमिवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांनी सोमवारी (ता.17 जून) पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत संशय व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT