Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
मुंबई

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठा निर्णय

सरकारनामा ब्यूरो

NCP : मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आघाडी करण्यासंदर्भात आम्ही तिन्ही पक्ष तसेच समाजवादी पक्ष, शेकाप यांच्यासोबत आघाडी करण्याबाबत जिल्हास्तरावर अधिकार दिले आहेत. जिथे शक्य आहे तिथे आघाडी करण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिल्या आहेत, असे प्रदेशाध्य जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रस पक्षाची बैठक आज मुंबईमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीनंतर जयंत पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, सरकारने चांगले काम केले तर कौतुक करु. पण काही निर्णय चुकले तर राष्ट्रवादी अधिक आक्रमकपणे भूमिका बजावणार आहे. सप्टेंबर अखेरीस राज्यस्तरावर राष्ट्रवादीचे एक अधिवेशन शिर्डी येथे होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. शिंदे गटात प्रचंड नाराजी आहे. एका विशिष्ट माध्यमातून नाराजी दिसत आहे, असा टोला त्यांनी लगावाला.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावर पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ते मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाले त्यावर चर्चा झाली. अन्य विषयावरही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. आज पवार साहेब मुंबईत आले म्हणून बैठक लावली होती.

काँग्रेस आमच्या बरोबर आहे. काँग्रेस ज्येष्ठ नेते बरोबर आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबईत आल्यावर चर्चा करू तेव्हा भूमिका बदलले असे वाटते. लातूर, बीड, उस्मानाबादमधील सोयाबीन पीक गोगलगायींनी संपवून टाकले. बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना मदत घोषणा केली. मात्र, गोगल गायीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याचा उल्लेख नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यासाठी शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी त्यांनी फडणवीसांकडे मागणी केली.

राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत सप्टेंबरमध्ये पक्षांतर्गत होणाऱ्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष संघटनात्मक निवडणुकींच्या तयारीबाबत चर्चा झाली. सामान्य जनतेचे प्रश्न यावर राष्ट्रवादी आक्रमक होणार, असल्याचे पाटील यांनी सांगितले. पक्षातील प्रमुख नेत्यांना मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सामान्यांचे प्रश्न मांडण्याच्या सूचना शरद पवार यांनी आज नेत्यांना दिल्या, असेही पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT