Shinde Cabinet Expansion : पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत : कदाचित माझी पात्रता नसेल...

माजी मंत्री पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांना मंत्रिपद मिळावे अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा होती.
Bjp  Leader Pankaja Munde
Bjp Leader Pankaja MundeSarkarnama

Munde Vs Fadnavis : राज्याच्या मंत्रिमंडळाचा दोन दिवसांपूर्वी विस्तार झाला. यात भाजपच्या नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांना मंत्रिपद मिळावे अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा होती. मात्र त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. एक काळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधणाऱ्या पंकजा मुंडे यंदाच्या रक्षाबंधनाला नाराज दिसल्या.

पंकजा मुंडे यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी विरोधात निवडणूक लढविली. यात पंकजा मुंडेंचा पराभव झाला. मंत्री असताना पंकजा मुंडे यांनी ज्या देवेंद्र फडणवीस यांना भाऊ म्हणून राखी बांधली. मात्र या दोन्ही नेत्यांतही आता वितुष्ट आहे. विधानपरिषदे निवडणुकीतूनही त्यांचे नाव डावलण्यात आले. आता मंत्रिपदही मिळाले नाही, अशातच आज रक्षाबंधन सणानिमित्त त्यांनी आपली खंत व्यक्त केली.

Bjp  Leader Pankaja Munde
पंकजा मुंडे, पाचपुतेंसह राष्ट्रवादीच्या दोन तर कॅाग्रेसच्या एका नेत्याला नोटीस...

पंकजा मुंडे म्हणाल्या, आज रक्षाबंधनचा दिवस आहे म्हणून राजकीय बोलणार नाही. सगळयांना माझ्या शुभेच्छा! राज्यात ओबीसी समाजाला त्यांचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवावे, अशी या सरकारकडून अपेक्षा आहे. कदाचित माझी पात्रता नसेल म्हणून मंत्रिपद दिला नसेल आणि जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते देतील. माझं यावर काहीच म्हणणं नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Bjp  Leader Pankaja Munde
Pankaja Munde| पंकजा मुंडे अजूनही नाराज आहेत का?

पंकजा मुंडे समर्थकांत संताप

पंकजा मुंडे यांचा आधी विधानपरिषदेच्या उमेदवार यादी समावेश करण्यात आला नाही. आता त्यांचे नाव मंत्रिपदाच्या यादीतही घेण्यात आले नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांत नाराजी आहे. पंकजा मुंडे यांचे समर्थक सुमारे 50 पेक्षाही जास्त विधानसभा मतदार संघात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com