Eknath Shinde
Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंचे वाढदिनीच राज्यातील जनतेला मोठं गिफ्ट

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज (दि.9 फेब्रुवारी) वाढदिवस. त्यानिमित्त शिंदे यांनी विविध योजनांचे उद्घाटन केले. यामध्ये जागरुक पालक सुदृढ बालक मोहीम, तसेच १८०० शाळांमधील १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, राज्यात ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर पार पडणार आहेत.

या बरोबरच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' या योजनेच्या विस्ताराची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी केली. राज्यातील सर्व घटकातील आरोग्य उत्तम राहण्यासाठी या सर्व उपक्रमाचे आयोजन करण्यात आलटे असल्याचे शिंदेंनी सांगितले. या अभियानाच्या उद्घाटनावेळी आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत, मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ''८० टक्के समाजकारण आणि त्यानंतर २० टक्के राजकारण या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार सरकारची वाटचाल सुरू आहे. राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्यादांच आरोग्याचा महायज्ञ होत आहे. सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या प्रश्नावर आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांच्या पुढाकारातून अभियान राबवण्यात येत आहे'', असं यावेळी त्यांनी सांगितलं.

आज मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे ''आपला दवाखाना'' योजनेच्या विस्ताराची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले, ''मुंबईनंतर आता राज्यातील प्रत्येक तालुक्यात 'आपला दवाखाना' सुरू करण्यात येणार आहे. तब्बल ५०० ठिकाणी या दवाखान्याचा शुभारंभ होणार असून याचा लाभ जनतेला होणार आहे'', असं ते यावेळी म्हणाले.

''राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून त्यांना आवश्यक ते उपचार देखील मिळणार आहेत. याचा लाभ राज्यभरातील जनतेला होईल. तसेच मी स्वतः देखील अनेकदा रक्तदान करीत असतो'', असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

राज्यात तब्बल ३६६ ठिकाणी महारक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करा, आणि एखाद्या गरजूला जीवनदान द्या, असं आवाहन देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT