Harshada Kakade News : हर्षदा काकडेही शेवगाव-पाथर्डीमधून विधानसभेसाठी मैदानात; म्हणाल्या...

Shevgaon-Pathardi : आगामी विधानसभा निवडणुकीत आपणही उमेदवारीसाठी दावेदार असल्याचे हर्षदा काकडे यांनी सांगितले आहे.
Harshada Kakade
Harshada KakadeSarkarnama
Published on
Updated on

आपल्याला पाथर्डी तालुक्यात यायला आवडेल. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपणसुद्धा उमेदवारीसाठी दावेदार असल्याचे सूचक वक्तव्य माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत हर्षदा काकडे या शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून मैदानात असू शकतात. त्यांच्या या वक्तव्याने तसे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

पद्मभूषण वसंतदादा पाटील विद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. तसेच यावेळी प्रेमा सोनवणे या विद्यार्थिनीला लंडनमध्ये नोकरी मिळाल्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला.

Harshada Kakade
CM Eknath Shinde Birthday News : अशाही शुभेच्छा...मंत्रिमंडळात महिलांना स्थान द्या!

पुढे बोलताना काकडे म्हणाल्या, ''पाथर्डीकरांना वाटते शेवगावमध्ये विकास होत आहे. तर शेवगावकरांना वाटतं पाथर्डीचा विकास होत आहे. प्रत्येक्षात मात्र काहीच काम होताना दिसत नाही. कामांच्या नावाने बोंबाबोंब आहे. आबासाहेब काकडे यांच्यासारखी दूरदृष्टी शिरसाठ यांच्याकडे होती. समाजाचे आपण देणे लागतो, ही भावना जोपासत त्यांनी शिक्षणसंस्था काढली. त्यांचा आदर्श इतरांनी घ्यायला हवा'', असंही त्या यावेळी म्हणाल्या.

Harshada Kakade
Pradnya Satav News : प्रज्ञा सातव यांचा मोठा गौप्यस्फोट : नोव्हेंबरमध्येही माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न; पण मी सिरियसली घेतले नव्हते...

दरम्यान, आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीचा हंगाम सुरू होणार आहे. यातच आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनीही शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये रंगत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com