Sudhir More Death Case Sarkarnama
मुंबई

Sudhir More Death Case : नगरसेवक सुधीर मोरेंच्या आत्महत्या प्रकरणी माजी आमदाराच्या मुलीवर गुन्हा दाखल; मृत्यू संशयास्पद ?

Chetan Zadpe

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांच्या आत्महत्येने मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी नवी माहिती समोर येत आहे. आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार शांताराम चव्हाण यांची मुलगी निलिमा चव्हाण (Nilima Chavan) यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलिमा चव्हाण आणि सुधीर मोरे यांच्यात शेवटचा संवाद झाल्याची माहिती समोर येत आहे. (Latest Marathi News)

माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली होती. घाटकोपर आणि विद्याविहार रेल्वेस्थानकाजवळ ही घटना घडली. दरम्यान निलिमा चव्हाण आणि मोरे यांच्यात शेवटचा संवाद घडून आला होता. त्यानुसार आता निलिमा चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे.

कोणे होते सुधीर मोरे ?

विक्रोळी परिसरातील सामाजिक कामात सुधीर मोरे सक्रीय कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने एक सच्चा शिवसैनिक गमावला असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. मोरे यांच्यावर काही वर्ष रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी होती. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT