Rahul Gandhi News : मुंबईतील 'इंडिया'ची बैठक संपताच राहुल गांधींनी पवार, ठाकरेंना डिवचलं; म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी फुटली पण...

Congress Political News : '' नरेंद्र मोदी सत्तेत आले तेव्हा त्यांनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली होती. पण...''
Rahul Gandhi, Uddhav Thackeray, Sharad Pawar, Sonia Gandhi
Rahul Gandhi, Uddhav Thackeray, Sharad Pawar, Sonia GandhiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारविरोधात एकत्र आलेल्या 'इंडिया' आघाडीची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्वाचे ठराव करतानाच २०२४ ला भाजपचा पराभव करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

तसेच इंडिया आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचा दावा करतानाच एकीचे दर्शन घडविण्याचाही प्रयत्न करण्यात आला. पण मुंबईतील ही बैठक संपत नाही तोच काही क्षणातच काँग्रेस नेते राहुल गांधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना डिवचलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या स्वागतासाठी टिळक भवनात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपवर टीकेची तोफ डागली. राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी(Narendra Modi) सत्तेत आले तेव्हा त्यांनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली होती. पण, जे ब्रिटिशांना जमले नाही ते यांना कसं जमेल.

Rahul Gandhi, Uddhav Thackeray, Sharad Pawar, Sonia Gandhi
Rahul Gandhi News : 'इंडिया'ची बैठक संपताच राहुल गांधींचं मोदींना ओपन चॅलेंज ; म्हणाले, ''...२०२४ ला भाजपचं जिंकणं अशक्य ! ''

याचवेळी त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी फुटली, पण काँग्रेस फुटली नाही असल्याचे सांगत ठाकरे - पवारांना(Sharad Pawar) टोला लगावला आहे. यावेळी ते म्हणाले, काँग्रेस हा पक्ष फुटला नाही. कारण आमचा एक विचारधारेचा पक्ष आहे. आमच्यात एकच डीएनए मिळेल. तो कुणाला भीत नाही. हा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. हा बब्बर शेरचा पक्ष आहे. या पक्षात वाघिणी देखील आहेत.

भाजप, नरेंद्र मोदी आणि आरएसएसला काँग्रेस पक्षाची भीती वाटते. महाराष्ट्रात यांची सफाई होणार आहे. इंडिया आघाडी भाजपला हरवणार आहे. काँग्रेस पक्ष नक्की जिंकेल. जे कर्नाटकात झालं ते महाराष्ट्रात होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Rahul Gandhi, Uddhav Thackeray, Sharad Pawar, Sonia Gandhi
Modi Will Contest Lok Sabha In Pune : गुजरात, यूपीनंतर मोदी लोकसभा लढविणार महाराष्ट्रात?; काँग्रेसच्या 'या' आमदाराने दिले आव्हान

अदानींचा पैसा काँग्रेसला संपवू शकणार नाही...

एका जगातल्या दोन वृत्तपत्रांनी एक बातमी प्रसिध्द केली. त्यात एक लाख बिलियन डॉलर्स भारताबाहेर वेगवेगळ्या देशात गेला आणि पुन्हा देशात येतो. आणि त्यात लिहिलं होतं, मोदीजी का अदानींशी जवळचे आणि जुने नातं आहे.पैसै देशाबाहेर जातो. अदानींच्या शेअर्सचे पैसे वाढले जातात.

त्याच पैशातून अदानी भारतातील इन्फास्ट्रक्चर, विमानतळ, रेल्वे स्थानकांचा विकास केला जात आहे. त्यात त्यांना धारावीचाही विकास करायचा आहे. कुठुन कुठन त्यांना असे स्वप्नं पडतात माहिती नाही. ते म्हणाले, अदानी समूहाचा पैसा भारतातून बाहेर गेला आणि पुन्हा भारतात आला.अदानी आमचं काही करु शकत नाही. अदानींचा पैसा काँग्रेसला संपवू शकणार नाही.

Rahul Gandhi, Uddhav Thackeray, Sharad Pawar, Sonia Gandhi
Maratha Reservation Agitation In Jalna : मराठा आरक्षण आंदोलन चिघळले; जालन्यात पोलिसांचा गोळीबार अन् लाठीचार्ज

...त्यांना आता धारावीत येऊन तमाशा करायचाय!

देशभरात हे सुरु असताना त्यांना आता धारावीत येऊन तमाशा करायचा आहे. पण त्यांना धारावी काय आहे. तेथील लोक कसे आहेत हे अजून समजलेले नाही. हे थोड्याच दिवसांत काँग्रेस पक्ष त्यांना समजून देईल. धारावी काय आहे, खरा भारत, जमिनीवरचा भारत, आणि गरीबांचा भारत आहे. भाजपच्या लोकांना वाटतं की, हे मिटवता येईल. हा त्यांचा गैरसमज आहे. नाही मिटवता येणार अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com