Kalyan Dombivli MNS Sarkarnama
मुंबई

Kalyan Dombivli MNS News: फेरीवाल्यांना मनसेचा दणका; विद्यार्थ्याशी उर्मट वर्तन करणाऱ्याला दिला चोप

MNS Feriwala Marhan: मनसैनिकांनी 'स्कायवॉक'वर जाऊन परप्रांतीय फेरीवाल्यांना 'मनसे स्टाइल'ने दणका दिला

शर्मिला वाळुंज

Dombivali News : कल्याणमध्ये एका विद्यार्थ्याशी परप्रांतीय फेरीवाल्यांनी वस्तू खरेदीवरून उर्मट वर्तन केल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या फेरीवाल्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. वस्तू खरेदीवरून एका विद्यार्थ्याशी फेरीवाल्यांनी उर्मट वर्तन केले होते. त्यानंतर या फेरीवाल्यांनी त्या विद्यार्थ्याला मारहाणही केली. हा प्रकार संबंधित विद्यार्थ्याने कल्याणमधील मनसे पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातला. त्यानंतर मनसैनिकांनी 'स्कायवॉक'वर जाऊन परप्रांतीय फेरीवाल्यांना 'मनसे स्टाइल'ने दणका दिला आहे.

वाशिंदमधील एक विध्यार्थी कामानिमित्त रविवारी कल्याणमध्ये आला असता, 'स्कायवॉक'वर एका फेरीवाल्याकडून एक वस्तू खरेदी केली. मात्र, वस्तू खराब वाटल्याने ती वस्तू विद्यार्थ्याने फेरीवाल्यास परत केली. पण त्या वस्तूचे पैसे परत देण्यास फेरीवाल्याने नकार दिला. तसेच मराठी भाषेचा आपमान करत विद्यार्थ्याशी हुज्जत घातली.

यानंतर त्या मुलानेही मराठी माणूस आणि मराठी भाषेवर काही बोलू नका, असे सांगितले. अन्यथा मी मनसेवाल्यांकडे जाईल, असे सांगितले. याचवेळी तेथील तीन-चार जणांनी शिवीगाळ करत त्याला मारहाण केली. या घडलेल्या प्रकाराची तक्रार त्या विद्यार्थ्याने कल्याण पूर्वेमधील मनसे शाखेत केली.

त्यानंतर मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी 'स्कायवॉक'वर जात तेथील परप्रांतीय फेरीवाल्यांना चोप दिला. यानंतर त्या फेरीवाल्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मुलुंडमध्ये मराठी महिलेला गुजराती समाजातील एका व्यक्तीने कार्यालय नाकारले होते. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर याची दखल मनसे कार्यकर्त्यांनी घेत संबंधित व्यक्तीला माफी मागायला लावली होती, पण यानंतर आता असाच प्रकार कल्याणमध्ये घडला आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT