Kolhapur Politics : 'बदल हवा तर आमदार नवा,' समरजितसिंह घाटगेंनी पुन्हा मुश्रीफांना डिवचले

Hasan Mushrif News : कागलमध्ये पुन्हा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हं
Samarjit Singh Ghatge, Hasan Mushrif News
Samarjit Singh Ghatge, Hasan Mushrif NewsSarkarnama
Published on
Updated on

राहुल गडकर

Kolhapur News : कागल विधानसभा मतदारसंघामध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि भाजपचे (BJP) नेते समरजितसिंह घाटगे यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीत संघर्ष अटळ आहे. निवडणुकीपर्यंत अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजप एकत्र असेल किंवा नसेल, पण मुश्रीफ यांच्या विरोधात घाटगे यांनी रणशिंग फुंकले आहे.

मुश्रीफ यांचा पराभव करूनच आमदार होईल, असा विडा घाटगे यांनी उचलला आहे. त्यावर पुन्हा समरजितसिंह घाटगे यांनी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना डिवचले आहे. मुरगुड येथे स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'चला संकल्प करूया, ७५ हजार लाभार्थ्यांना लाभ देऊया' उपक्रमांतर्गत 'समरजितसिंह आपल्या दारी' अभियानावेळी त्यांनी मुश्रीफांवर तोफ डागली.

Samarjit Singh Ghatge, Hasan Mushrif News
Parbhani Loksabha Constituency : खासदार जाधवांना परभणीकर निष्ठेचे फळ देणार का ?

घाटगे म्हणाले, शासनाच्या योजनांच्या लाभासाठी कागलमध्ये नागरिकांना वर्षानुवर्षे मंत्र्यांच्या दारात चकरा माराव्या लागत आहेत. त्यांच्या राजकीय सभा समारंभांना उपस्थितीची लाभार्थ्यांवर सक्ती करून वेठीस धरले जाते, असा आरोप केला.

ही लाचारी व एजंटगिरी मोडून काढण्यासाठी राज्यात सर्वप्रथम समरजितसिंह (Samarjit Singh Ghatge) आपल्या दारी हा अभिनव उपक्रम आम्ही राबविला आहे. जनतेला 'बदल हवा, तर आमदार नवा' अशी टॅगलाइन देऊन घाटगे यांनी मुश्रीफ यांना डिवचले आहे. त्यामुळे घाटगे आणि मुश्रीफ यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळणार असल्याची चर्चा आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Samarjit Singh Ghatge, Hasan Mushrif News
Nanded District Bank : अशोक चव्हाणांकडे ज्याचे वजन भारी तोच ठरणार बॅंकेचा कारभारी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com