Free Treatment in Public Hospital :  Sarkarnama
मुंबई

Free Treatment in Public Hospital : राज्य सरकारचा मोठा निर्णय; शासकीय रुग्णालयांमध्ये मिळणार मोफत उपचार

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यावरून महापालिकेच्या रुग्णालयातील ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला.तर, दुसरीकडे राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना मोफत उपचार देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

येत्या १५ ऑगस्टपासून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्ण दगावल्याने या रुग्णालयातमंध्ये कसे उपचार मिळणार असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. (Free Treatment) राज्य सरकारच्या निर्णयानुसार, २८ डिसेंबर २०१५ रोजीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्णयानुसार, सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवा, तपासण्यांचे दर निश्चित करण्यात आले होते. या निर्यणानंतर रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणी शुल्क द्यावे लागणार नाही. रुग्णांना सर्व सेवा मोफत दिल्या जाणार आहेत.

राज्यातील गरीब, आर्थिकदृ्ष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. आरोग्य संस्थामधील औषधे व उपचारावरील रुग्ण शुल्क नि:शुल्क होणार असल्यामुळे सर्व वंचित, दुर्बल घटकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

केंद्र सरकारच्या माध्यामातून रुग्णांसाठी'आयुष्मान भारत योजना' आणि 'महात्मा फुले जन आरोग्य योजना' यासारख्या महत्त्वाकांक्षी योजना आधीपासूनच राबवल्या जात आहेत. या योजनांतंर्गत सरकारकडून पाच लाख रूपयांपर्यंतच्या आरोग्य खर्चाची हमी सरकारने घेतली आहे. तसेच, राष्ट्रीय रक्त धोरणानुसार रक्त आणि रक्त घटक पुरवठा यासाठी आकारले जाणारे दर वगळता रूग्णालयांत केल्या जाणाऱ्या तपासण्या, उपचार आणि सार्वजनिक भागीदारी तत्त्वावरील वैद्यकीय सेवा मोफत करण्यात येणार आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT