Sharad Pawar News  Sarkarnama
मुंबई

Jayant Patil News : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बदलणार... बैठकीत झाले महत्त्वपूर्ण निर्णय

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज ता. (4) राष्ट्रवादी भवन येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

सरकारनामा ब्यूरो

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज ता. (4) राष्ट्रवादी भवन येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यामध्ये पक्षांतर्गत निवडणूक, पक्ष संघटना, पक्ष बांधणी यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) बैठक झाल्यानंतर जयंत पाटील आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी पाटील म्हणाले, महाराष्ट्रात बुथ स्तरावर बांधणीसाठी काही विभागीय नेते नेमण्यात आले आहेत. पवार साहेबांच्या उपस्थितीत एक दिवसीय विभागीय शिबीरे घेण्यात येणार, असल्याचेही त्यांनी सांगितले.

पक्षांतर्गत निवडणुका तालुका, जिल्हा स्तरावर एक-दीड महिन्यात पूर्ण केल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष बदणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच एप्रिल व मे महिन्यात ही पक्ष शिबीरे घेण्यात येणार आहेत. याशिवाय महाविकास आघाडीच्या सभा सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे झाली. पुढची सभा नागपूरला होणार आहे. दरम्यानच्या, काळात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना जबाबदारी देऊन काम करण्याची सूचना करण्यात आली असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिल्यांदा विभागीय स्तरावरील शिबीरे होणार आहे. सर्व नेते जिल्ह्यांचा दोन महिन्यात दौरा करणार आहेत. हा पक्षाच्या वाढीसाठी कार्यक्रम आहे. त्याप्रमाणे काम केले जाणार आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT