Mumbai High Court
Mumbai High Court Sarkarnama
मुंबई

मुंबईतील वाॅर्डरचना वादात : भाजपची न्यायालयात धाव

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मुंबई महालिकेच्या (BMC) हद्दीत नव्याने करण्यात आलेल्या वॅार्डरचने विरोधात हायकोर्टात (High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. वार्डरचनेत करण्यात आलेला बदल हा संविधानिक असून आम्हाला मान्य नसल्याचे मुंबई महापलिकेचे सदस्य नगरसेवक अभिजित सामंत (Abhijit Samant) आणि राजश्री शिरवाडकर (Rajshree Shirwadkar) यांनी सांगितले. म्हणुनच राज्य सरकारच्या (State Government) वॅार्डरचनेच्या विरोधात याचिका दाखल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याचिकाकर्त्या राजश्री शिरवाडकर म्हणाल्या की, 2011 च्या जनगणनेच्या आधारावर 2017 मध्ये वॅार्ड रचनेत बदल करण्यात आले होते. त्यामुळे लगेचच 2022 च्या महापालिका निवणुकीसाठी फेरबदल कशासाठी करण्यात येत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे आगामी 2022 च्या होणाऱ्या महापालिका निवडणुका सुद्धा 2017 च्या वार्डरचने नुसारच घेण्यात याव्या, अशी मागणी त्यांनी केली.

शिरवाडकर म्हणाल्या, वॅार्डरचनेत जर नव्याने फेरबदल करायचाच असेल तर, पुन्हा जनगणना करा आणि बदल करा अन्यथा आता केल्या जात असलेल्या असंविधानिक वार्डरचनेला आमचा विरोध असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावरून त्यांनी शिवसेनेवर सुद्धा टीका केली आहे.

दरम्यान, आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेत बदल करण्यात आला आहे. शहरांचा विस्तार वाढल्याने सीमालगतचा भाग शहरात समाविष्ट केल्याने वॉर्डाची संख्या वाढवण्यात आली असा युक्तीवाद सरकारकडून आला आहे. यामुळे वॅार्डरचनेत बदल करण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका 2022 वर्षात होणार आहेत.

राज्यातील बहुतांश महापालिकांमधील भाजपचे वर्चस्व कमी करुन आपली ताकद वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत असल्याचा अनेकदा भाजपकडून आरोप करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT