Uddhav Thacketray On Devenndra Fadnavis :  Sarkarnama
मुंबई

Kalank Word Dispute : 'कलंक' शब्दावरून राजकीय घामासान; फडणवीसांच्या काविळ टीकेवर दानवे म्हणतात, 'कावळ्यांची..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : 'कलंक' या शब्दावरून महाराष्ट्राचं राजकारण पेटलेले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल नागपूरमध्ये सभेला संबोधित करत होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कठोर वार केले होते. फडणवीस हे नागपूरला लागलेले कलंक आहेत, असे उल्लेख ठाकरेंनी केला. ठाकरेंनी कलंक हा शब्द वापरल्यामुळे भाजप आता आक्रमक झाली आहे. स्वत: देवेंद्र फडणवीसांनी ‘कलंकीचा काविळ’ कावीळ असं म्हणत ठाकरेंवर पलटवार केला होता. (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ठाकरेंचा समाचार घेतला होता. यानंतर आता पुन्हा ठाकरे गटाकडून फडणवीसांना लक्ष्य करण्यात आले आहे. ट्विट करत त्यांनी पुन्हा '८ ' मुद्यांच्या आधारे दानवेंनी फडवीसांवर प्रश्न विचारले आहेत. कावळ्यांची काविळ असा उल्लेख करत दानवेंनी फडणवीसांवर निशाणा साधले.

अंबादास दानवे ट्विट करत म्हणाले, "कावळ्यांची काविळ!

१. ज्यांच्या विरुद्ध लढून तुमच्या पक्षाचा पाया मजबूत केला अश्या गोपीनाथ मुंडे यांच्या लढ्याला तिलांजली देऊन त्यांचे राजकीय वैरी फोडाफोडीने जवळ करणे, याला म्हणतात कलंक!

२. 'मन की बात' उर्दूतून प्रसिद्ध करणे, मशिद भ्रमण करणे आणि पुन्हा स्वतःला हिंदुत्वाचा पाईक म्हणणे, याला म्हणतात कलंक!

३. समुद्रात झेप घेऊन मर्सिलिस बंदर गाठणाऱ्या वीर सावरकरांना 'भारतरत्न' पुरस्कार न देणे, याला म्हणतात कलंक!

४. राम मंदिर आंदोलनात कारसेवकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश देणाऱ्या व्यक्तीला 'पद्मविभूषण' देणे, याला म्हणतात कलंक!

५. आपल्या विरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तींना दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करणे, वारकऱ्यांवर लाठ्या चालवणे, याला म्हणतात कलंक!

६. महाराष्ट्रातून दरदिवशी ७० महिला बेपत्ता होतात आणि त्यांचा थांगपत्ता लावण्यात पोलिसांना यश येत नाही, हा आहे कलंक!

७. कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार न करता त्यांचे शव गंगेत वाहू देणे, पीएम केअर फंडाचा हिशेब जनतेपुढे न ठेवणे, याला म्हणतात कलंक!

८. कोरोना महामारी शिखर गाठत असताना पश्चिम बंगालसारख्या दाट लोकसंख्येच्या राज्यात हट्टीपणाने निवडणुकांच्या प्रचारसभा घेणे, परिस्थिती अनुकूल नाही म्हणून महाराष्ट्रात निवडणूका न घेणे, याला लोकशाहीवर कलंक म्हणतात!

कलंक नसताना तो दिसणे त्याला नजरेतील दोष म्हणतात, दिसून न दिसल्यासारखं करणे त्याला ढोंगीपणा म्हणतात. उपचार आता भाजपवर होतील आणि ते जनताच करणार आहे. त्रिशूळ असल्याचे सोंग तुम्ही आणता, मात्र तिसरा डोळा मतदारांकडेच आहे. ते योग्यवेळी तो उघडतील आणि कलंक पुसतील. (A political battle over the word Of kalank)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT