Uddhav Thackeray| CM Eknath Shinde| sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News :''राज्यात सध्या उध्दव ठाकरेंच्या मनातलेच मुख्यमंत्री..''; शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

Eknath Shinde And Uddhav Thackeray : ...तर फडणवीस ठाकरेंना मोठ्या मनानं माफ करतील!

सरकारनामा ब्यूरो

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. नंतर निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला दिले. या सगळ्या घडामोडीनंतर मात्र, एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. मागील काही दिवसांत फडतूस-काडतूस टीकेनंतर फडणवीस आणि शिंदे यांच्यातील वाद प्रचंड विकोपाला गेला आहे. याचदरम्यान, परंतू याचवेळी शिंदे गटाचे नेते व मंत्री दीपक केसरकर यांनी मोठं विधान केलं आहे.

ठाण्यातील रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला नेत्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप करत ठाकरे गट आणि महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून ठाकरेंनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याचवेळी आता मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar)यांनी राज्यात सध्या उद्धव ठाकरेंच्या मनातले मुख्यमंत्री राज्यात आहेत. त्यामुळे त्यांना शिंदे मुख्यमंत्री झाल्याचं फारसं वाईट वाटलं नसेल असं विधान केलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा आणि रोशनी शिंदे मारहाण प्रकरणानंतर तापलेल्या राजकारणावर भाष्य केलं. केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा उद्यापासून (८ एप्रिल) सुरु होणार आहेत. यात शिंदे या अयोध्या दौऱ्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहे. दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये अयोध्येतील महाराष्ट्र भवनाबद्दल सकारात्मक चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.

सध्या राज्यात ठाकरेंच्या मनातलेच मुख्यमंत्री...

एकनाथ शिंदे सध्या राज्यात चांगलं काम करत आहेत. मुळात उद्धव ठाकरे यांनी ठरवलं होतं की, शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं. परंतु त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझ्यावर मुख्यमंत्री होण्यासाठी दबाव टाकला असं उद्धवसाहेबांनी सांगितलं. अन्यथा आता एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असते. त्यामुळे राज्यात सध्या उद्धव ठाकरेंच्या मनातले मुख्यमंत्री राज्यात आहेत. त्यामुळे त्यांना शिंदे मुख्यमंत्री झाल्याचं फारसं वाईट वाटलं नसेल असं विधान केसरकर यांनी केलं आहे.

...तर ते केवळ उद्धव ठाकरेंच्या हातात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगूनही ते आले नाहीत, उद्धव ठाकरे यांनी मोदींना दिलेलं वचन मोडलं याचा मी साक्षीदार आहे. पण शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षात काही जुळवायचं असेल तर ते केवळ उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे असल्याचंही केसरकर म्हणाले.

फडणवीस ठाकरेंना मोठ्या मनानं माफ करतील...

राज्याला फडतूस गृहमंत्री लाभल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यावरून ठाकरे यांच्यावर शिंदे गटासह भाजमधील नेत्यांनी टीका केली. याच मुद्द्यावरून भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे यांनी माफी मागावी, फडणवीस मोठ्या मनानं त्यांना माफ करतील. ठाकरे तुम्ही चूक केली, फडणवीस घराणं फक्त सुशिक्षितच नाही तर संस्कृत देखील आहे. विचार न करता उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT