Dr. Tatyarao Lahane Sarkarnama
मुंबई

Tatyarao Lahane : विनापरवानगी शस्त्रक्रिया केल्याचा समितीचा ठपका : डॉ.लहानेंनी आरोप फेटाळले, प्रकरण काय?

Dr. Tatyarao Lahane: डॉ.तात्याराव लहाने यांनी 698 डोळ्यांच्या शस्त्रक्रिया विनापरवानगी केल्याचा ठपका जे.जे रुग्णालयातील त्रिसदस्यीय समितीने ठेवला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.तात्याराव लहाने यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. डॉ.तात्याराव लहाने यांनी 698 डोळ्यांच्या शस्त्रक्रिया विनापरवानगी केल्याचा ठपका जे.जे रुग्णालयातील त्रिसदस्यीय समितीने ठेवला आहे.

डॉ.तात्याराव लहाने यांनी पदावर नसताना विनापरवानगी डोळ्याच्या शस्त्रक्रिया केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती.

त्यानंतर आता या त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल सादर केला असून त्यामध्ये डॉ.तात्याराव लहाने यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तर जे.जे रुग्णालयातील त्रिसदस्यीय समितीने केलेले आरोप डॉ.तात्याराव लहाने यांनी फेटाळले आहेत. आरोपांमध्ये काहीही तथ्य नसून त्रिसदस्यीय समितीने केलेला अहवाल हा एकतर्फी असल्याचा दावा डॉ.तात्याराव लहाने यांनी केला आहे.

नेमकं आरोप काय?

डॉ.तात्याराव लहाने ऑगस्ट ते डिसेंबर 2022 या दरम्यान कोणत्याही पदावर नव्हते. यावेळी त्यांनी जे.जे.रुग्णालयात विनापरवानगी डोळ्याच्या शस्त्रक्रिया केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांची चौकशी करण्याच्या पार्श्वभूमीवर जे.जे रुग्णालयाच्या प्रशासनाकडून त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. आता या समितीने या आरोपांची चौकशी करत आपला प्राथमिक अहवाल रुग्णालय प्रशासनाकडे सादर केला आहे.

या अहवालामध्ये डॉ.तात्याराव लहाने यांनी ऑगस्ट ते डिसेंबर 2022 या काळात विनापरवानगी तब्बल 698 डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे डॉ.तात्याराव लहाने यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पण हे सर्व आरोप डॉ.तात्याराव लहाने यांनी फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, या सर्व आरोपावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. डॉ. लहाने म्हणाले, "माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे एकतर्फी आहेत. याबद्दल माझी कुठलीही चौकशी झाली नाही. आम्हाला याबाबत कोणीही विचारणा देखील केलेली नाही. राज्य सरकारने आदेश दिल्यानंतरच मी काम सुरू केलं होतं. त्यामुळे सर्व शस्त्रक्रिया नियमामध्येच केलेल्या आहेत", असं डॉ.तात्याराव लहाने यांनी सांगितलं.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT