JJ Hospital Case: मोठी बातमी!डॉ.तात्याराव लहाने यांचा राजीनामा राज्य सरकारकडून मंजूर

Dr.Tatyarao Lahane Resignation: तात्याराव लहाने यांच्या जागी तात्काळ नवीन नियुक्ती करण्याचे राज्य सरकारचे आदेश
Dr.Tatyarao Lahane Resignation:
Dr.Tatyarao Lahane Resignation: Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंबईतील प्रसिध्द जे.जे.रुग्णालयातील ज्येष्ठ डॉ.तात्याराव लहाने यांचा राजीनामा राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. जेजे रुग्णालयातील काही निवासी डॉक्टरांनी डॉ.तात्याराव लहाने यांच्या बदलीसाठी आंदोलन पुकारलं होतं. त्या पार्श्वभूमीवर तात्याराव लहाने यांनी आपला राजीनामा दिला होता.

डॉ.तात्याराव लहाने यांचा राजीनामा राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या जागी तात्काळ नवीन नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Dr.Tatyarao Lahane Resignation:
Resignation Of 9 Doctors: मोठी बातमी! डॉ. लहानेंसह जे.जेच्या ९ डॉक्टरांचे तडकाफडकी राजीनामे, केले 'हे' गंभीर आरोप

जे.जे. रुग्णालयातील काही डॉक्टर आणि प्राध्यापक विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला होता. या विरोधात त्यांनी आंदोलन करत डॉ.तात्याराव लहाने यांच्या बदलीची मागणी केली होती. या आरोपानंतर डॉ.तात्याराव लहाने यांच्यासह नऊ डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे दिले होते.

Dr.Tatyarao Lahane Resignation:
Omraje Nimbalkar On his Fathers memorial day : आमदार, खासदार झालो तरी राजेसाहेब, तुमचा मुलगा हीच माझी खरी ओळख..

त्यानंतर तात्याराव लहाने यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडत त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या ज्येष्ठ डॉ.तात्याराव लहाने यांच्यावर निवासी डॉक्टरांनी गंभीर आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर डॉ.तात्याराव लहाने यांनी तडकाफडकी राजीनामा देत आपली भूमिका मांडली. मात्र, आज राज्य सराकारने त्यांनी दिलेला राजीनामा मंजूर केला आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com