Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुमारे महिन्याभरानंतर मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले. आता महायुतीमध्ये पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे.
यातच मुंबई मंत्रालयाच्या प्रशासकीय इमारतीत चांगले दालन खेचून घेण्यासाठी मंत्र्यांमध्ये चढाओढ रंगली आहे. महायुती सरकारमध्ये मंत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दालनांवरून रुसवेफुगवे देखील वाढले आहेत.
महायुती (Mahayuti) सरकारमध्ये 42 मंत्री आहेत. त्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहे. या तिघांना मुंबई मंत्रालयातील इमारतीत सहाव्या मजल्यावर जागा करून द्यावी लागणार आहे. अन्य 39 मंत्री आणि राज्यमंत्र्यांसाठी दालने उपलब्ध करून देण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.
राज्यात यापूर्वी देखील जम्बो मंत्रिमंडळाचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे राज्यमंत्र्यांना विधानभवनात दालने उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी 33 कॅबिनेट मंत्र्यांना चांगल्या दालनाची अपेक्षा आहे. यातून वाद होण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हस्तक्षेप करावा लागू शकतो.
मंत्रालयाच्या प्रशासकीय इमारतीत प्रत्येक विभागाची कार्यालये असलेल्या मजल्यावरच मंत्र्यांची दालने असायची. पुढे मंत्र्यांची ज्येष्ठतेवरून हेवेदावे सुरू झाले आणि ही प्रथा मोडली. दालन सहाव्या मजल्यावर असण्यासाठी मंत्र्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली.
महायुती सरकारमधील मंत्र्यांमध्ये पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. तिन्ही पक्षांचे अनेक ज्येष्ठ नेते एकेका जिल्ह्यातून मंत्री झाल्यामुळे त्यांनी पालकमंत्रीपदावर दावे ठोकायला सुरवात केली आहे. प्रत्येक मंत्र्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे खातेवाटप होताच पालकमंत्रीपदासाठी मंत्र्यांमध्ये चढाओढ रंगली आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये मंत्रीपदे मिळाली नाहीत. त्यामुळे एकापेक्षा जास्त मंत्रीपद मिळालेल्या जिल्ह्यांतील मंत्र्यांना बाहेरच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद भूषवावे लागणार आहे. महायुती सरकारमध्ये 35 कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे राज्यमंत्र्यांना पालकमंत्रीपदावर संधी मिळणे अवघडच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.