Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या व्यासपीठावर महिलेचा भोजपुरी गाण्यावर डान्स, राज ठाकरे बरसले

Raj Thackeray Criticized Eknath Shinde : राजकीय सभे आधी असं व्यासपीठावर नाचायची पद्धत ही युपी, बिहारमध्ये आहे. मात्र, आपण कुठे चाललोय, असा सवाल राज ठाकरेंनी केली.

Roshan More

Raj Thackeray On CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उभारलेल्या व्यासपीठावर भोजपुरी गाण्यावर महिलेने डान्स केला. मुख्यमंत्री शिंदे येण्याच्या आधी भोजपुरी गाण्यावर डान्स सुरू होता.

व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री शिंदे यांचा फोटो आणि नाव होते. तसेच उमेदवाराचे नाव देखील या बॅनरवर होते. यावरून राज ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी त्यांच्या व्यासपीठावर भोजपूरी गाण्यावर एक महिला नाचते. ही आहे का तुमची लाडकी बहीण योजना.'

'सभेपूर्वी मला कोणीतरी एक क्लिप पाठवलR. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आत्ताच्या सभेच्या व्यासपीठावर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते आहे. लोकांचं एंटरटेनमेंट व्हावं म्हणून एक बाई नाचतीय व्यासपीठावर.

त्या व्यासपीठावर एकनाथ शिंदेंचा फोटो आहे. त्यावर त्या उमेदवाराचं नाव आहे. त्याच्यावर एक महिला नाचतीये भोजपुरी गाण्यावर ही लाडकी बहीण योजना', असे संतापून राज ठाकरेंनी विचारले

महाराष्ट्राचा युपी, बिहार होतोय?

राजकीय सभे आधी असं व्यासपीठावर नाचायची पद्धत ही युपी, बिहारमध्ये आहे. मात्र, आपण कुठे चाललोय असा सवाल राज ठाकरेंनी केली. हे आपल्याकडे सुरू झालं. म्हातारी मेली याचं दु:ख नाही पण काळ सोकावतोय, असे देखील राज ठाकरे म्हणाले.

शरद पवारांनी फोडाफोडी केली

राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधत राज्यात फोडाफोडीचे राजकारण शरद पवारांनी सुरू केल्याचे म्हटले. फोडाफोडीच्या राजकारणाचे आद्यकर्ते शरदचंद्र पवार आहेत. पहिल्यांदा 1978 ला काँग्रेस फोडली. 1992 ला शिवसेना फोडली, 2005 ला परत नारायण राणेंना फोडले, तिकडे पण आमदार फोडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT