Satej Patil: मधुरिमाराजेंची माघार, सतेज पाटील कार्यकर्त्यांसमोर रडले

Kolhapur Congress Controversy: मधुरिमाराजे यांच्या माघारीनंतर काँग्रेसचा अधिकृत उमेदवार कोल्हापूर उत्तर मतदारसंघात असणार नाही. मात्र, मधुरिमाराजे यांनी उमेदवारी मागे घेताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठी घोषणा केली.
Satej Patlil
Satej Patlilsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी माघार घेतली. त्यामुळे संतप्त झालेल्या सतेज पाटील आणि शाहू महाराज यांच्यात टोकाचे वाद झाले. त्यात कार्यकर्त्यांसमोर बोलताना सतेज पाटील यांनी अश्रु अनावरण झाले.

कार्यकर्त्यांसमोर बोलताना माईक बाजुला करून सतेज पाटील यांनी डोळ्यांना हात लावत आपला हुंदका आवरण्याचा प्रयत्न करत होते. सतेज पाटील यांची ही अवस्था पाहून कार्यकर्त्यांनी आपल्याला खचायचं नाही लढायचं अस म्हणत ढाण्या वाघाचा, सतेज पाटलांचा विजय असो, अशा घोषणा दिल्या.

मधुरिमाराजे यांच्या माघारीनंतर काँग्रेसचा अधिकृत उमेदवार कोल्हापूर उत्तर मतदारसंघात असणार नाही. मात्र, मधुरिमाराजे यांनी उमेदवारी मागे घेताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठी घोषणा करत काँग्रेसने आधी उमेदवारी दिलेले अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना पाठींबा जाहीर केला आहे.

Satej Patlil
Pune Election: महायुती पुणे जिल्ह्यातील इतक्या जागा जिंकणार; पंकजा मुंडेंनी आकडाच सांगितला

दम नव्हता तर...

मधुरिमारेजा यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर दम नव्हता तर उभं राहायचे नव्हत ना. मी पण दाखवली असती माझी ताकद, असे शाहू महाराजांना सतेज पाटील यांनी संतापून सुनावले.

उमेदवारी मागे का?

मधुरिमाराजे यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी खासदार शाहू महाराज हे आग्रही होते. एकाच घरात दोन पद नको अशी भूमिका त्यांनी घेतल्याची माहिती आहे. तसेच माध्यमांशी बोलताना म्हणाले, नाईलाजाने मधुरिमाराजे यांना माघार घ्यावे लागली. काँग्रेसचे राजेश लाटकर हे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांवर जी वेळ येत त्यामुळे आम्ही ठरवले अशा परिस्थितीमध्ये निवडणूक लढायची नाही.

Satej Patlil
Aurangabad Central Assembly: `भविष्यात आमदारकी देण्याचा फॅक्स पाठवा तरच माघार`, उद्धवसेनेच्या बंडखोराची अजब अट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com