Nandu Joshi
Nandu Joshi Sarkarnama
मुंबई

BJP Leader Molestation Women : धक्कादायक! भाजप पदाधिकाऱ्याकडून महिलेचा विनयभंग; केली शरीरसुखाची मागणी

शर्मिला वाळुंज

Dombivali BJP News : डोंबिवलीतील भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने महिलेचा विनभंग केल्याची घटना समोर येत आहे. या पदाधिकाऱ्याने महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदू जोशी असे या भाजप (BJP) पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तथा डोंबिवली पूर्व मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी एका महिलेकडे घर खाली करण्याची धमकी देत शारीरिक सुखाची मागणी केली. या प्रकरणी संबंधित महिले मानपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. दरम्यान, महिलेने केलेले आरोप जोशी यांनी फेटाळले आहेत.

नंदू जोशी म्हणाले, "तक्रार करणारी महिला माझ्या मित्राची पत्नी आहे. दोघांमध्ये वाद सुरु आहेत. मी मित्राला मदत करतो, असे त्यांना वाटते. त्यातून त्यांचा माझ्यावर राग आहे. या रागातूनच त्यांनी माझ्याविरोधात तक्रार केली आहे. मी आतापर्यंत कधीही त्या महिलेला कधी फोनही केलेला नाही. संदेश पाठवलेला नाही. कधी समोरही बोललेलो नाही. याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी."

दरम्यान भाजपच्या वतीने मानपाडा पोलिसांविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या वतीने सांगण्यात आले की, मानपाडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत राजकीय पक्ष तक्रारी करतात. भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे. यातून जोशी यांच्या बदनामीचे कारस्थान पोलिसांंनी रचल्याचा आरोपही भाजपने केला. मानपाडा पोलीस ठाण्यासमोर गुरुवारी (ता. १ जून) सकाळी ११ वाजता निषेध आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी यावेळी दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT